Nashik News | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा उद्या महाराष्ट्रात; नाशकात जाहीर सभेचे आयोजन

0
37
PM Narendra Modi
PM Narendra Modi

Nashik News | उद्या शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता पंचवटी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी होणारी ही पहिली सर्वात मोठी सभा असल्याने या सभेची सर्वत्र चर्चा आहे.

Nashik News | 15 ही मतदारसंघात उमेदवार देण्याचे मनसेचे स्वप्न भंगले; केवळ पाचच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

हरियाणाच्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपा उत्सुक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने होणार आहे. हरियाणातील विजयानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्याची पुनरावृत्ती करण्याकरिता कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. देशाच्या विकासाचे नियोजित चित्र उद्या पंतप्रधानांच्या भाषणातून मांडले जाणार आहेत.

Nashik News | निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदगाव व मालेगाव बाह्य मतदारसंघातून 53 सराईत गुन्हेगार हद्दपार

महायुतीच्या विजयासाठी मोदींची सभा महत्त्वपूर्ण

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रभावी नेतृत्व व जनतेत केलेल्या कामामुळे महायुतीवरील जनतेचा विश्वास वाढत चालला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकण्यासाठी मोदींची ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. असे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य व संघटन प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य प्रदीप पाटील यांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here