Nashik News | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालेगाव बाह्य व नांदगाव विधानसभा मतदारसंघावर पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी नांदगाव, मनमाड शहर तसेच मालेगाव तालुक्यातील 53 हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारतीय यांनी मनाई आदेश जारी केल्याने गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी
नांदगाव मतदारसंघातील 3 केंद्रे संवेदनशील असून गेल्या आठवड्यात राजकीय वादातून दमबाजीचे काही अनुचित प्रकार घडले आहेत. या घटनांची पोलीस तसेच निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून नागरिकांवर राजकीय दबाव टाकण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्यामुळे नांदगाव, मनमाड शहर व मालेगाव तालुका पोलिसांनी हिस्ट्रीशूटर तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 54 संशयित यांची यादी तयार करण्यात आली होती.
53 गुन्हेगारांना निवडणूक कालावधीसाठी मतदारसंघातून हद्दपार केले आहे
मनमाडच्या 19, नांदगावच्या 13 आणि मालेगाव तालुक्यातील 20 गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करत, अपर अधीक्षकांकडे पाठवण्यात आले होते. त्यानुसार, नवीन भारतीय नागरी सुरक्षा व संहिता कायद्यांतर्गत अपर अधीक्षकांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार प्राप्त झाले आहेत. या अधिकारांचा वापर करत अपर पोलीस अधीक्षक भारती यांनी 53 जणांना निवडणूक कालावधीसाठी मतदारसंघातून हद्दपार केले आहे. दरम्यान मतदान करण्यासाठी येण्याची या संशयितांना विनंती केल्यास त्यांना काही तासांची शिथिलता दिली जाईल. असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
“निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेतली जात असून सराईतांच्या गुन्हेगारी कुंडल्या जमा केल्या आहेत. प्रवेश बंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार.”
– अनिकेत भारती, अपर पोलिस अधीक्षक, मालेगाव
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम