Deola | देवळ्यातील मार्केट यार्ड परीसरात आढळला अनोळखी मृतदेह

0
43
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथे जुन्या मार्केट यार्ड आवारात गुरुवारी दि. ७ रोजी एका अनोळखी व्यक्तीचा (अंदाजे वय ३८) मृतदेह आढळून आला आहे. देवळा येथील जुन्या मार्केट यार्ड आवारात आज गुरुवारी दि. ७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह माल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना आढळून आला. याची माहीती बाजार समिती प्रशासनाला देण्यात आली.

Deola | देवळा शहरात धाडसी घरफोडी; पाच लाखांहून अधिक सोने लंपास

देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

प्रशासनाने तात्काळ या घटनेची माहिती देवळा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर बेवारस व्यक्तीचा मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून, याची कोणाला ओळख पटल्यास देवळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असे आवाहन पो. हवालदार चव्हान यांनी केले आहे. या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here