Bhaskar Bhagre | महामार्गांच्या विविध समस्यांबाबत खा. भगरेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत सकारात्मक चर्चा

0
11
Bhaskar Bhagre
Bhaskar Bhagre

वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी |  केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची खासदार भास्कर भगरे यांनी मुंबई आग्रा तसेच पिंपळगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्ग वरील विविध समस्यांबाबत भेट घेत चर्चा करत समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. आग्रा महामार्गवरील दहावा मैल व चांदवड येथे क्लोज वॉल भुयारी पूल मंजूर आहे मात्र येथे पिलर उड्डाणपुल होणे अत्यावश्यक असल्याने सदर उड्डाणंपुल व्हावा व सदर काम तात्काळ सुरु व्हावे. त्याचप्रमाणे शिरवाडे वणी सोग्रस फाटा येथील उड्डाणपूलाच्या कामास मंजुरी द्यावी. तसेच राहुड घाटात होणारे नेहमीचे अपघात यावर उपाययोजना करणे व चिंचवे तालुका देवळा या गावाजवळ भुयारी मार्ग स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी करण्यात आली.

Onion News | खा. भास्कर भगरेंनी संसदेत मांडली कांदा उत्पादकांची व्यथा

पिंपळगाव सापुतारा मार्गांचे काम चार वर्षापासून सुरू असून आज त्या रस्त्याची अवस्था बऱ्याच ठिकाणी रस्त्याला भेगा खड्डे गटारीची काम अपूर्ण असताना पांडणे येथे टोल चालू केल्यामुळे प्रवासी टोल भरण्यास नकार देत आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम ताबडतोब पूर्ण करावे स्थानिक नागरिकांना टोल आकारू नये याबाबत सविस्तर चर्चा झाली. गडकरी यांनी दहावा मैल व चांदवड या ठिकाणी फ्लायओव्हर उड्डाणपूल कसा करता येईल याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या तसेच चांदवड पासून धुळ्याकडे जाणारा मार्ग सहा पदरी करताना राहुड घाटातील होणाऱ्या अपघातांवर उपाययोजना करणार असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे पांडाणे टोल नाक्यावरील अपूर्ण राहिलेली कामे ताबडतोब पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here