Deola Crime | फरार सुनील आहेरांच्या अडचणीत वाढ; वैश्याव्यवसाय प्रकरणी अटकेची टांगती तलवार..?;

0
20
Deola Crime
Deola Crime

Deola Crime |   देवळा मालेगाव रस्त्यावरील हॉटेल वेलकम येथे दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिसांच्या पथकाने धाड टाकली असता तेथे दोन बांग्लादेशी महिलांना डांबून ठेवत अवैधरित्या वैश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी हॉटेल मॅनेजर दिपक ठाकरे याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. तर, सदर हॉटेलचे मालक सुनील उर्फ गोटु आबा आहेर हे तेव्हापासून फरार आहेत. दरम्यान, आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून उच्च न्यायालयाने आहेर यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.

सुनील आहेर यांनी नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता दि. १२ मार्च २०२५ रोजी जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. सदर अर्ज दि. २ एप्रिल २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला असल्याने सुनील आहेर यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे.

Deola | हॉटेल वेलकममध्ये वैश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या महिलांची सुटका

Deola Crime |  नेमकं प्रकरण काय..? 

दिनांक २१ फेब्रुवारी रोजी हॉटेल वेलकम येथे पोलिसांनी धाड टाकत येथे सुरू असलेला अवैध वैश्याव्यवसाय उध्वस्त करून कारवाई केली होती. येथे दोन बांग्लादेशी गरजु महिलांना पैशांचे आमिष दाखवुन त्यांना सदर हॉटेलमध्ये डांबून ठेवत त्यांच्याकडुन बळजबरीने वैश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली होती. तर तेव्हापासून हॉटेल मालक सुनील उर्फ गोटू आबा आहेर हे फरार आहेत. तर सदर हॉटेल हे भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिले असल्याचे स्पष्टीकरण आहेर यांच्याकडून देण्यात आले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here