Nashik Crime | नाशकात नाकाबंदीदरम्यान 33 लाख रुपयांची रक्कम जप्त

0
50
#image_title

Nashik Crime | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. त्याच अनुषंगाने सर्वत्र प्रचाराला वेग आला असून या धामधुमीत नाकाबंदीदरम्यान बेकायदेशीरपणे 33 लाख रुपयांची रक्कम नाशिक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहे. काल दि. 6 नोव्हेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी आयकर विभागासह एसएसटी पथकास कळविले आहे.

Nashik Crime | EVM हॅक करण्यासाठी पैशांची मागणी करणारा संशयित ताब्यात; गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी कडेकोट बंदोबस्त

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली असून उमेदवारी अर्ज व छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून कोणत्या मतदारसंघात आता कोणामध्ये लढत होणार आहे. हे निश्चित झाले आहे. तेव्हा उमेदवारांनी आता डोर टू डोअर प्रचारासह विविध भागांमध्ये यंत्रणा राबवून प्रचार सुरू केला आहे. या प्रचारादरम्यानच निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, त्याचबरोबर मतदारांना कोणीही प्रलोभन दाखवू नये किंवा असे प्रकार टाळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी जलद शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अपराधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या सूचनेनुसार गावांत, उपनगरांमध्ये व राज्य मार्गांवर एसएसटी पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

Nashik Crime | EVM मशिन आयटी फ्रॉड्सच्या विळख्यात; निवडणुक जिंकवून देण्याचे आमिष दाखवत 42 केली लाखांची मागणी

नाकाबंदी दरम्यान 33 लाख 7 हजारांची रक्कम जप्त

याच दरम्यान पथकांसह त्या-त्या पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक संशयास्पद माल ट्रक, कार व वाहनांची तपासणी करत असताना बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी रात्री गिरणारे जवळील दुगाव येथे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित आमले व पथकाकडून नाकाबंदी दरम्यान संशयास्पद कार अडवण्यात आली. यावेळी झडती घेतली असता कारमध्ये 33 लाख 7000 ची रोख रक्कम आढळून आली. या रकमेबाबत कारमधील दोघांकडे विचारणा केली असता त्यांना तपशील देता आला नसल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया करून आयकर विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच संशयितांकडे पोलीस आणि निवडणूक पथक चौकशी करत असल्याची माहिती आहे. तसेच संशयित नाशिकमधून दुगाव मार्गे गिरणारे येथे जात असल्याची माहिती समोर आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here