Nashik Crime | राज्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वसामान्यांना हैराण करणारे आयटी फ्रॉड्स आता निवडणुकीपर्यंत पोहोचले आहेत. नाशिक शहरात बुधवारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार वसंत गीते यांच्या कार्यकर्त्यांसह असाच एक धक्कादायक प्रकार घडला. पक्षाच्या कार्यालयात आलेल्या एका उत्तर भारतीय व्यक्तीने विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्र (EVM) सेटिंग करणारे लोक माझ्याजवळ आहेत. असे म्हणत खळबळ उडवली. “तुम्हाला जर ही निवडणूक जिंकायची असेल तर 42 लाख द्या. आगामी निवडणुकीत मतदानात 30 ते 40 टक्के मतदान तुम्हाला होईल अशी व्यवस्था करून देतो. तुम्ही पैसे नाही दिले तर, तुमचा पराभव करण्याची व्यवस्था ही मी करू शकतो.” असे सांगत धमकावले. हे ऐकल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांनी “याबाबत आपण काहीही करू शकत नाही.” असे सांगत पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांना धमकावत पळ काढला. हा प्रकार समजताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Nashik Crime | देवळालीत अज्ञातांनी व्यापाऱ्याला लुटले; 60 हजारांची रोकड लंपास
पोलिसांना याबाबत गांभीर्याने तपास करण्याच्या सूचना
सदर प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी देखील त्याची दखल घेत वरिष्ठांना कळविले असून पोलीस आयुक्तांनी संबंधित प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु ती व्यक्ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अशा बोगस व निनावी फोन कॉलद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. ती फसवणूक पोलिसांच्या कार्यक्षेत्रा बाहेर असल्याने गुन्हेगारांना जाळ्यात अडकवण्यासाठी पोलिसांना प्रचंड धावपळ करायला लागते. आता हाच प्रकार उमेदवारी देण्यापासून तर मतदानाचे यंत्र हॅक करण्याच्या धमकीपर्यंत पोहोचल्याने निवडणूक यंत्रणा ही त्यापासून सुटलेली राहिलेली नाही? हे दिसून येते आहे. अशा प्रकारांचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे पोलिसांना याबाबत गांभीर्याने तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी याबाबत पथक तयार करून संबंधितांचा शोध सुरू केला आहे.
Nashik Crime | अवैध सावकारी करणारा सराईत फरार; दोन साथीदार अटकेत
विधानसभेपूर्वीही घडला होता प्रकार
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचा उमेदवार ठरवण्यासाठी उमेदवारांकडे 50 लाख रुपयांची मागणी करण्याचा प्रकार नाशिक शहरात घडला होता. नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार असून त्यांना, “आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाशी संबंधित आहोत. भाजपची उमेदवारी हवी आहे, तर 50 लाख रुपये द्या. अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रार केल्यावर त्यात सर्वेश मिश्रा उर्फ दिनू सुरेंद्र मिश्रा व गौरव बहादुर सिंग नाथ या दोघांना दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी या करिता सर्व यंत्रणा कार्यरत असून असे असताना देखील संबंधित घोटाळे आणि आयटी फ्रॉड्स पैसे कमवण्यासाठी ईव्हीएम मशीनपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे उमेदवारांची व निवडणुकीची विश्वासार्हता दोन्हीही अडचणीत आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम