Nashik News | 15 ही मतदारसंघात उमेदवार देण्याचे मनसेचे स्वप्न भंगले; केवळ पाचच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

0
64
#image_title

Nashik News | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक जिल्ह्यातील 15 ही जागांवर उमेदवार देणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात केवळ सहाच उमेदवार दिले आहेत. त्यातही नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून मनसेची उमेदवारी मिळालेल्या अंकुश पवार यांनी माघार घेतल्यामुळे आता जिल्ह्यात केवळ पाचच जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Nashik News | निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदगाव व मालेगाव बाह्य मतदारसंघातून 53 सराईत गुन्हेगार हद्दपार

प्रबळ उमेदवार न मिळाल्याने केवळ सहाच जागांवर उमेदवारी जाहीर

नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जायचा. मनसेने जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न करताना जिल्ह्यातील 15 ही जागांवर उमेदवार देण्याची तयारी दर्शवली होती. त्याकरिता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा आढावा देखील घेतला होता. इच्छुकांच्या मुलाखती घेत पक्ष संघटनांची माहिती जाणून घेतली होती. तसेच याबाबतचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्तही करण्यात आला होता. मात्र बहुतांश मतदारसंघात सक्षम उमेदवार मिळाला नसल्यामुळे मनसेने नाशिक मध्य, देवळाली, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नांदगाव, इगतपुरी या सहाच मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत.

मध्य मतदारसंघातून ऐनवेळी माघार

दरम्यान, मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेले मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे आता जिल्ह्यात मनसेचे केवळ पाचच उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामुळे 15 जागांचे स्वप्न पाहणाऱ्या मनसेला केवळ पाचच जागांवर समाधान मानावे लागले आहे. आता या पाचपैकी कोणता उमेदवार मनसेचे जिल्ह्यात खाते उघडतो हे पाहणे आता महत्त्वाच्या ठरणार आहे.

Nashik News | नाशकात तरुणाईला ड्रग्सच्या विळख्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले; वसंत गीतेंचे भाजपवर गंभीर आरोप

मध्य मतदारसंघातून माघारीचा लाभ कोणाला? 

लोकसभा निवडणुकीला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला व आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यातही मध्य मतदार संघात मनसेने ऐनवेळी यादी प्रसिद्ध करीत जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे त्यांच्या या माघारीचा लाभ कोणत्या पक्षाला होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर भाजपला या माघारीचा लाभ होऊ शकतो अशी चर्चा आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here