Ganesh Nimbalkar | चांदवड-देवळ्याच्या मतदारांची पसंती यंदा ‘शेतकरी नेत्याला’..?

0
3
Ganesh Nimbalkar
Ganesh Nimbalkar

तनुजा शिंदे : Ganesh Nimbalkar |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, नाशिकच्या जागेवर सर्वच पक्ष हे आपापले दावे करत आहेत. दरम्यान, वरिष्ठ पातळीवर पक्षांमध्ये तर, स्थानिक पातळीवर स्थानिक इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू आहे. मात्र, नाशिकच्या चांदवड-देवळा मतदार संघात आगामी लोकसभेपेक्षा विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांचीच चढाओढ सुरू आहे. यासाठी मतदार संघातील जनतेनेच एक पोल घेतला असून, यात मतदारांनी यंदा सत्तापालट होण्याचा कौल दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा मतदार संघ हा जिल्ह्यातील प्रमुख विधानसभा मतदार संघांपैकी एक आहे. या दोन्ही तालुक्यांचे सांस्कृतिक तथा राजकीय महत्त्वही मोठे असून, या मतदार संघाने केंद्रीय पातळीवरही नेतृत्व केले आहे. त्यामुळे येथील निवडणुकांकडे सगळ्यांचेच लक्ष असते.

सध्या हा विधानसभा मतदार संघ भाजपच्या ताब्यात असून, येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांची मागील दोन टर्मपासून सत्ता आहे. तर, यंदा ते हॅटट्रिक करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, गेल्या १० वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्याकडून विधीमंडळात किंवा मतदार संघात हवे तसे काम झाले नाही. तसेच तालुक्यातील कांदाप्रश्नी किंवा पाणीप्रश्नी देखील त्यांनी ठोस भूमिका न मांडल्याने मतदार नाखुश असल्याचे दिसत आहे. तर, याआधी या मतदार संघावर कॉंग्रेसचे राज्य होते. शिरीष कोतवाल हे या मतदार संघाचे नेतृत्व करत होते. (Ganesh Nimbalkar)

Deola | ज्यांनी केली कांदा निर्यातबंदी त्यांनाच करा मतदान बंदी – गणेश निंबाळकर

Ganesh Nimbalkar | यंदा शेतकऱ्याला नेतृत्वाची संधी

मात्र, आता एका सामान्य शेतकऱ्याला नेतृत्वाची संधी देण्याचा कौल मतदारांनी दिलेला आहे. मतदार संघात घेण्यात आलेल्या पोलनुसार, विद्यमान आमदार आणि इतर मोठा गाजावाजा असलेल्या इच्छुक उमेदवारांना मागे टाकत मतदारांनी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश निंबाळकर यांना पसंती देत मतदारांच्या मनातील उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.

एवढेच नाहीतर, गणेश निंबाळकरांची मतदार संघातील लोकप्रियता पाहता इतर उमेदवारांनी स्वखुशीने माघार घेण्याची विनंतीही जनतेने सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे. तसेच गणेश निंबाळकर यांचा प्रचार करण्यासाठी गावागावात स्वखर्चाने प्रचार करण्याची तयारीही त्यांच्या चाहत्यांनी दाखवली आहे. (Ganesh Nimbalkar)

Deola |  “प्रहार” चे “बिऱ्हाड” तहसील कार्यलयावर…

गणेश निंबाळकरच का..?

गणेश निंबाळकर हे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आहेत. ते मूळचे चांदवड तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी असून, ते युवा शेतकरी आहेत. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ते नाशिकमध्ये प्रहारचे काम पाहत आहेत. ते शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवत असतात. त्यांच्या या कार्याची दाखल घेत त्यांना ‘हरित क्रांतीचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख’ यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मानाचा ‘क्रुषीरत्न’ हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. (Ganesh Nimbalkar)

गणेश निंबाळकरांचे आवाहन मतदारांनी मनावर घेतले 

त्यांनी स्थानिक शेतकरी, शेतमजूर, इतर मागास वर्गीय, दिव्यांग, तसेच दुर्बल घटकांसाठी अनेक कामे केली आहेत. ते त्यांच्या हटके आंदोलनांसाठी प्रसिद्ध असून, सरकारची तिरडी, बिऱ्हाड आंदोलन या त्यांच्या आंदोलनांनी अनेकांना घाम फुटला होता. तसेच कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात त्यांनी ‘ज्यांनी केली निर्यात बंदी त्यांना करा मतदान बंदी’ हे आवाहन यावेळी मतदारांनी मनावर घेतल्याचे दिसत असून, त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी जनतेकडून त्यांना आग्रह देखील केला जात आहे, असे झाले तर तालुक्यातील जनतेला एक नवा आणि सक्षम चेहरा मिळणार आहे. दरम्यान, तालुक्यातील एकूण परिस्थिती पाहता गणेश निंबाळकर हे यंदाच्या विधानसभा निवडणुकींच्या मैदानात उतरल्यास इतर उमेदवारांसाठी ते तगडे प्रतिस्पर्धी ठरतील.(Ganesh Nimbalkar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here