Deola | ज्यांनी केली कांदा निर्यातबंदी त्यांनाच करा मतदान बंदी – गणेश निंबाळकर

0
2
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  नाशिक जिल्ह्यात सार्वधिक कांदा उत्पादक शेतकरी असून, केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव कोसळे आहेत. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, बळीराजाची लूट ही अशीच सुरूच राहणार असल्याचे परखड मत प्रहारचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी गुरुवारी (दि. १८) रोजी देवळा तालुक्यातील खर्डे येथे  आयोजित सत्काराच्या दरम्यान व्यक्त केले. यावेळी निंबाळकर यांच्या हस्ते येथे लावण्यात आलेल्या “ज्यांनी केली निर्यात बंदी त्यांनाच करा मतदान बंदी!!” या फलकाचे पूजन करण्यात आले.(Deola)

Breaking News | आमदार रोहित पवारांनाही ईडीकडून समन्स

Deola | ज्यांनी केली निर्यातबंदी त्यांना करा मतदान बंदी

खर्डे येथील प्रहारच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी गणेश निंबाळकर यांना हरित क्रांतीचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मानाचा ‘क्रुषीरत्न’ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निंबाळकर म्हणाले की,”येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपल्या मतदानाचा दबाव निर्माण करायला हवा आणि त्यासाठी ज्यांनी केली कांदा, सोयाबीनवर निर्यातबंदी त्यांनाच करा आता मतदान बंदी” असे आवाहन खर्डे येथील तरूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी केले. (Deola)

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप पवार यांनी केले. याप्रसंगी सरपंच जिभाऊ मोहन, उपसरपंच सुनील जाधव, प्रहारचे चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, कार्याध्यक्ष गणेश तिडके, युवा तालुकाध्यक्ष चंद्रभान जाधव, विनोद शिंदे, दीपक जाधव, गणेश पाचोरकर, पिंटू तिडके, समाधान पवार, नामदेव पवार आदी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.

Manoj Jarange | मनोज जरांगेंची राजकारणात एन्ट्री?; वाचा प्रकरण काय

तसेच यावेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, युवा तालुका अध्यक्ष बापू देवरे, विकास सोसायटीचे संचालक कारभारी जाधव, सुभाष मोरे, शिवसेनेचे विजय जगताप, देवळा शेतकी संघाचे संचालक बापू जाधव, माधव ठोंबरे, शशिकांत पवार, भास्कर जाधव, भाऊसाहेब देवरे, पोलीस पाटील भारत जगताप, विशाल मोरे, रामदास पवार आदींसह
गावातील तरुण शेतकरी आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here