सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जन विश्वास सप्ताह’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा अंतर्गत शुक्रवारी दि.२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी सदस्य यशवंत शिरसाट होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतिक सदस्य व विधानसभा अध्यक्ष योगेश आहेर, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार, नगरसेवक संतोष शिंदे आदींसह शेतकी संघाचे अध्यक्ष संजय गायकवाड, संचालक कैलास देवरे, डॉ.किरण आहेर, शरद आहेर, बंडू परदेशी आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम