Manoj Jarange | मनोज जरांगेंची राजकारणात एन्ट्री?; वाचा प्रकरण काय

0
3
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. दरम्यान, आता मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) हे राजकारणात यावे अशी अनेकांची इच्छा आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे.

दरम्यान, मराठा समाजासह मनोज जरांगे हे उद्या अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे मुंबईत आंदोलन होणार आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊ नये. यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारचे शिष्टमंडळ सातत्याने  मनोज जरांगे यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आंदोलन मागे न घेण्यावर जरांगे ठाम आहेत.

दरम्यान, जरांगेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात यावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांच्या कडून केले जात आहे. लोकसभा निवडणुक लढवून आणि ती जिंकून मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी चांगला लढा देता येईल, असे प्रकाश आंबेडकर म्हटले आहेत.

Manoj Jarange | मनोज जरांगेंवर हत्येचा गुन्हा दाखल करा; सदावर्ते पुन्हा बरळले

Manoj Jarange | काय म्हणाले प्रकाश आंबेडकर..?

दरम्यान, यावेळी ते म्हणाले की, “माझ्या माहितीनुसार, गरीब मराठ्यांचा हा लढा हा गेल्या ३५ वर्षांपासून चालत आलेला आहे. मात्र, इथल्या श्रीमंत मराठ्यांनी त्याला कधीही स्वरुप आणि आकार दिला नाही. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्याला एक स्वरुपही आलं. त्याचबरोबर ही एक स्पेसिफिक मागणी आहे हे सुद्धा पुढे आले. मात्र, गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचं एक वेगळं ताट निर्माण करायचं असल्यास जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या बरोबरच आता राजकीय आणि लोकसभेबाबत भूमिका घेतली पाहिजे”, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना केलं आहे.

Manoj Jarange | दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री जरांगेंशी साधणार संवाद

गरीब मराठ्यांचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे

“जरांगे पाटील हे या या गरीब मराठ्यांचा आवाज, जो आवाज आज जरांगे पाटील रस्त्यावर उभा करत आहेत. तो उद्या लोकसभेत सुद्धा गेला पाहिजे. तिथेही गरीब मराठ्यांचा प्रतिनिधी गेला पाहिजे. त्यांचं आंदोलन सुरू असताना ते या दृष्टीनेही विचार करतील. त्यांचे सहकारीही याबाबत विचार करतील आणि योग्य ती भूमिका घेतील. अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी मांडली आहे.(Manoj Jarange)

मनोज जरांगे आता लोकसभा निवडणूक लढवणार.?

दरम्यान, वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मनोज जरांगे यांना राजकारणात येण्याचं आणि लोकसभा निंवडणुक लढवण्याचे थेट आवाहन केले आहे. आता प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला मान देऊन मनोज जरांगे खरंच राजकारणात येणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.(Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here