Mumbai Crime | पिल्लू दोन मिनिटं त्रास होईल,पण…; महिन्यानंतर प्रेयसीचा मृतदेह हाती

0
33
Mumbai Crime
Mumbai Crime

Mumbai Crime |  प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट असते, मिळवण्याची नाही. मात्र, हे समजून न घेता अनेक ठिकाणी एकतर्फी प्रेमातून इर्षेच्या किंवा नैराश्याच्या भावनेने अनेक लोक चुकीची पाऊले उचलतात. यामुळे अनेक ठिकाणी प्रेमाचा थरारक शेवट झाल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे.

या घटनेत प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “पिल्लू तुला आता फक्त दोन मिनिटं त्रास होईल. पण पुढच्या जन्मात आपण नक्की भेटू”, असे म्हणत त्याने आधी तिला संपवलं आणि नंतर स्वतःही रेल्वेच्या खाली येत, स्वतःचे आयुष्य संपवले. ही घटना कुठल्या ॲक्शन मूवी मध्ये नाहीतर खारघर येथे घडली आहे. (Mumbai Crime)

Pune Crime | विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय; आरोपी अभिनेत्री ताब्यात

या घटनेतील मृत प्रियकराचे नाव वैभव बुरुंगले असून, प्रेयसीचे नाव वैष्णवी बाबर असे आहे. या दोघांचे प्रेम प्रकरण होते. मात्र, तिच्या घरच्यांना हे मान्य नव्हते. त्यामुळे वैष्णवी त्याला टाळत होती. दरम्यान, “तु माझी नाही झाली तर तुला कुणाचीच नाही होवू देणार”, अशा भावनेतून त्याने तिची हत्या केली. ही घटना उघडकीस आली आणि संपूर्ण शहरात ती वाऱ्याच्या वेगाने पसरली. मात्र, यामुळे आता परिसरात दहशतीचे वतावरण पसरले आहे. (Mumbai Crime)

Mumbai Crime | नेमकं प्रकरण काय..?

ही घटना १२ डिसेंबर रोजी घडली असून, ती आता समोर आली आहे. प्रियकर वैभव याने खारघरच्या टेकडी येथील परिसरात तिला भेटायला बोलावलं होतं. दरम्यान, दुपारच्या सुमारास त्याने तिला संपवले आणि संध्याकाळी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या खाली उडी घेत त्यानेही आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हाईस नोट रेकॉर्ड केलेले होते आणि त्याच्याच आधारे हे संपूर्ण प्रकरण उघड झाले.

Sex Tips | सेक्स करताना चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

२४ वर्षीय वैभव बुरूंगले आणि १९ वर्षीय वैष्णवी बाबर यांच्यात प्रेम होतं. मुलीच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता.  म्हणून ती त्याला टाळत होती. मात्र, ती जर माझी नाही झाली तार, तिला कोणाचीच नाही होऊ देणार, या भावनेतून त्याने खारघर डोंगराच्या निर्जनस्थळी बोलावून तिचा गळा दाबून तिला संपवले. विशेष म्हणजे गळा आवळताना तो म्हणाला की, “पिल्लू तुला दोन मिनिटं त्रास होईल. पण आपण पुढच्या जन्मात भेटू”, आणि असे म्हणत त्याने तिच्या गळ्याचा घोट घेतला. ही व्हाईसनोट पोलीसांना त्याच्या मोबाईलमध्ये सापडली आहे. यात मुलाचा मृत्यू झाला होता. तर, मुलीचा मृतदेह शोधायला पोलिसांना तब्बल एक महिना लागला. (Mumbai Crime)

तिची हत्या कुठे केली हे नोटमध्ये…

त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याच्या मोबाईल मध्ये ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवलेली होती. ज्यात त्याने तिची हत्या ओवेकॅम्प गावाच्या मागे केलेली असल्याचे लिहिलेले होते. दरम्यान, पोलीसांनी या संपुर्ण परिसरात शोध मोहिम राबविली आणि त्यानंतर त्यांना एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. (Mumbai Crime)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here