सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील कनकापूर कांचने येथील ग्रामपंचायत हद्दीतील गायरानला बुधवारी दि.२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अज्ञात समाज कंटकाने आग लावून दिल्याने मोठ्या प्रमाणावर गवत जळून खाक झाल्याची माहिती गोरक्षक भाउसाहेब शिंदे यांनी दिली. देवळा तालुक्यातील कनकापूर कांचने येथील ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर गायरान जमीन असून, यातील काही गायरानचा भाग येथील गोरक्षक भाउसाहेब शिंदे यांनी आपल्या गोशाळेसाठी लिलाव बोलीवर गावाला ७५ हजार रुपये देऊन घेतला होता. याठिकाणी ते गोशाळेत असलेले जनावरांना चाऱ्यासाठी घेऊन जातात. मात्र बुधवारी दि.२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास या राखीव गायरानला आग लागून यात मोठ्या प्रमाणावर गवत व पाला पाचोळा जळून गेल्याचे समजते. याठिकाणी घनदाट अरण्य देखील असून, पाणी नसल्याने आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. आगीचे कारण स्पष्ट समजू शकले नसून, यामुळे भर उन्हाळ्यात गो शाळेतील जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम