Skip to content

Pune Crime | विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय; आरोपी अभिनेत्री ताब्यात

Pune Crime

Pune Crime |  पुण्यात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात महिला सुरक्षेचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. दरम्यान, यामुळे आता पुण्यात महिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.(Pune Crime)

सांस्कृतिक देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. परंतु पुण्यात अनेक प्रकारचे गैरकारभार सुरु आहे. मसाज सेंटर आणि स्पा सेंटरमधील प्रकार उघड झाल्यानंतर आता आंतराराष्ट्रीय पातळीवर होणारा ऑनलाइन वेश्या व्यवसाय उघड झाला आहे.

 पुण्यात सध्या अनेक गैरकारभार सुरु आहे. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, मागच्या सहा महिन्यांत अनेक मसाज सेंटर तसेच स्पा सेंटरमध्ये हा व्यवसाय सुर असल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यात सध्या कोयता गँग तसेच कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरण तसेच इतर गुन्ह्याच्या घटनांमुळे दहशतीचे वातावरण आहे.दरम्यान, आता अशातच हे वेश्या व्यवसायाचे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणात संबंधित एका अभिनेत्रीसह तिघं जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.(Pune Crime)

Malegaon Crime | मालेगावमधील बेपत्ता चिमूरड्याचा मृतदेह चांदवड घाटात

Pune Crime | अभिनेत्री आणि मॉडेल ताब्यात 

पुणे शहरात एक हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय हा उघडकीस आला आहे. हा वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका राजस्थानी अभिनेत्रीलादेखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या राजस्थानी अभिनेत्रीसह आणखी दोन उजबेकीस्थानी मॉडेल असलेल्या मुलींनाही पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. पुण्यातील विमान नगर या परिसरात हा व्यवसाय सुरू होता. दरम्यान, पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.(Pune Crime)

Crime patrol | ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘दृश्यम’ बघून आई, वडील आणि भावाला संपवले

ऑनलाइन माध्यमातून सुरू होता वेश्या व्यवसाय

उजबेकीस्थानमधून आलेल्या या दोन मॉडेल येथून ऑनलाइन वेश्या व्यवसाय करत होत्या. यासंदर्भात पुणे पोलिसांना माहिती मिळाली असता, त्यांनी सापळा रचत या प्रकरणी राजस्थानच्या एका अभिनेत्रीसह उजबेकीस्थानच्या दोन मॉडेलला अटक केली आहे. दरम्यान, या तिन्ही महिला आरोपी पुण्यातील विमान नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून हा ऑनलाईन वेश्या व्यवसाय करत होत्या.(Pune Crime)

ऑनलाइन माध्यमातून विदेशातून त्या हा वेश्या व्यवसाय भारतामध्ये चालवत असल्याची माहिती तपासात उघड झाली. या तिन्ही आरोपी महिलांच्या विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुणे शहरात अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली असे अवैध धंदे सुरू असल्याचे काही प्रकार उघड झाले होते. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.(Pune Crime)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!