Central Railway | काय सांगता..! रेल्वे भंगारातून झाली मालामाल

0
4
Central Railway
Central Railway

Central Railway |  मध्य रेल्वेने (Central Railway) एक आगळावेगळा विक्रम रचला आहे. तर, भंगार समान विकून तब्बल करोडो रुपये रेल्वेने कमावल्याची माहिती समोर आली आहे. वापरात नसलेले आणि खराब झालेले भंगार सामान विकून मध्य रेल्वेने तगडे उत्पन्न मिळवले आहे. हे समान तब्बल तीनशे कोटी रुपये इतक्या किंमतीचे असल्याची माहिती आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या किंमतीचे उत्पन्न भंगारातून मिळवणारा मध्य रेल्वे हा देशातील एकमेव रेल्वे विभाग ठरला आहे.

विद्यमान आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अडीच महिने बाकी असताना, त्यापूर्वीच २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाचे भंगार समान विक्रीचे लक्ष्य हे पार केलेले आहे. दरम्यान, असे करणारी पहिली क्षेत्रीय रेल्वे होण्याचा टप्पा मध्य रेल्वे विभागाने गाठला असून, मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून तब्बल ३००.४३ कोटी रुपये कमावले आहे. एप्रिल ते डिसेंबर-२०२३ या आर्थिक वर्षातील विक्रीच्या उद्दिष्टापेक्षा तब्बल ३२.२३ टक्क्यांची वाढ या उत्तपन्नात झालेली आहे. जी सर्व क्षेत्रिय रेल्वेंपैकी सर्वाधिक ठरलेली आहे.(Central Railway)

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!अनेक मार्गांवर स्पेशल ट्रेन

दरम्यान, मध्य रेल्वेने (Central Railway) प्राधान्य देत जुने इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन, वापरात नसलेले काही जुने रूळ आणि जुने तथा काही अपघाती इंजिन आणि डब्बे, इत्यादी तसेच यासह विविध प्रकारचे भंगार साहित्य हे ओळखून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठीची पावले उचलली आहेत. शून्य भंगार या मोहिमेच्या अंतर्गत ही संपूर्ण कार्यवाही करण्यात आली असून, मध्य रेल्वेचे सर्व विभाग, कार्यशाळा तसेच शेड यांच्या एकत्रित प्रयत्नांचे शून्य भंगार मोहीम राबविण्यात आली आहे. सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वे कटिबद्ध असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Railway Massacre : आणि म्हणून त्याने केला होता रेल्वेत गोळीबार

मध्य रेल्वेचे एकूण भंगार हे तब्बल २२,३४३ मेट्रिक टन इतके होते. ज्यात प्रामुख्याने २३ इंजिनांसह २५२ रेल्वे डब्यांचा समावेश आहे. १४४ मालवाहू वॅगन्सचाही यात सहभाग आहे. भुसावळ विभागातील १२ किमी जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज रेल्वे रूळ यांचा प्रामुख्याने यात समावेश होता.

Central Railway | अशी आहे विभागनिहाय कमाई

१. भुसावळ विभाग –  ५९.१४ कोटी रुपये

२.  माटुंगा विभाग – ४७.४० कोटी रुपये

३. मुंबई विभाग – ४२.११ कोटी रुपये

४. पुणे विभाग – ३२.५१ कोटी रुपये

५. भुसावळ इलेक्ट्रिक लोको शेड विभाग – २७.२३ कोटी रुपये

६. सोलापूर विभाग – २६.७३ कोटी रुपये

७. नागपूर विभाग – २४.९२ कोटी रुपये

८. इतर ठिकाणी एकत्रित – ४०.३९ कोटी रुपये (Central Railway)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here