Benglore Farmer | धोतर घातलंय म्हणून शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; VIRAL VIDEO

0
77
Benglore Farmer
Benglore Farmer

Benglore :  एकीकडे भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असून, जगभरात भारतीय संस्कृतीबद्दल आदर निर्माण होत आहे. भारतीय योग परंपरा, भारतीय खाद्य संस्कृती, इत्यादींचा इतर देशांमध्ये अवलंब केला जात असताना आपल्याच देशात कर्नाटक सारख्या राज्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये ही  संतापजनक घटना घडली असून, येथे एका धोतर घातलेल्या वयस्कर शेतकऱ्याला मॉल प्रशासनाने मॉलमध्ये प्रवेश नाकारला आहे.

या शेतकऱ्याच्या मुलाने त्याच्या वडिलांना या मॉलमधील चित्रपटगृहात चित्रपट दाखवण्यासाठी सिनेमाचे तिकिट बूक केलं होतं. मात्र, मॉलमध्ये पोहचल्यावर तेथील गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्याने धोतर घातलंय म्हणून या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला. या घटनेचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेविरोधात संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यानंतर कर्नाटकमधील काही शेतकरी संघटनांनी त्या मॉलमध्ये आंदोलन करत मॉल मॅनेजमेंटला याबाबत धारेवर धरले.(Benglore Farmer)

Ladki Bahin Yojna | नाशिकमध्ये लाडक्या बहीणींचे अर्ज लाखाच्या वर; ग्रामीण भागातील महिलांची आघाडी

Benglore Farmer | नेमकं प्रकरण काय ? 

कर्नाटकमधील शेतकरी असलेल्या नागराजप्पा यांचा मुलगा त्यांना घेऊन चित्रपट पाहण्यासाठी या मॉलमध्ये पोहोचला. आणि चित्रपटाची तिकीट ऑनलाइन बूक केलेली होती. मात्र, मॉलमध्ये पोहोचल्यानंतर तेथील गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यांच्या मुलाने आपल्याकडील तिकिटे दाखवत आतमध्ये सोडण्यासाठी विनवणी केली. मात्र, धोतर घातलंय म्हणून त्यांना मॉलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना आपत्तीजनक वागणूक दिली. या प्रकाराचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आणि येथील कन्नड संघटनांकडून धोतर घालत मल्लमध्ये निदर्शने करण्यात आली. प्रकरण पेटल्यानंतर मॉलमध्ये पोलिस दाखल झाले. (Benglore G.T. world mall security guard stops farmer with dhoti)

मॉल मॅनेजमेंटने माफी मागत सत्कार केला 

दरम्यान, या प्रकाराबद्दल मॉल मॅनेजमेंट आणि कर्मचाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आणि आंदोलन तीव्र होत असल्याचे पाहून संबंधित मॉलच्या मॅनेजमेंटने त्या नागराजप्पा या शेतकऱ्याला बोलावून त्यांची माफी मागितली आणि शाल-श्रीफळ देऊन त्यांना सन्मानितही केले.

Manoj Jarange | खासदार भास्कर भगरे जरांगेंच्या भेटीला, सोबत भुजबळांचे कट्टर विरोधक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here