Skip to content

Manoj Jarange | मनोज जरांगेंवर हत्येचा गुन्हा दाखल करा; सदावर्ते पुन्हा बरळले

Manoj Jarange

Manoj Jarange |  येत्या २२ जानेवारी रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे राज्यातील सकल मराठा समाज बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या या आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शविला आहे. एवढेच नाहीतर, त्यांनी या आंदोलनाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिकादेखील दाखल केली आहे. तर, या याचिकेवर २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. यासोबतच पंढरपूर पोलीसांत दाखल प्रकरणी जरांगेंसह त्यांच्या समर्थकांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.(Manoj Jarange)

या याचिकेत सदावर्तेंनी “२६ जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल होऊन आंदोलन करण्याची धमकी देत कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याची भाषा केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या आंदोलनासाठीची परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणीही सदावर्तेंनी न्यायालयात केली आहे. त्यामुळे आता या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

मराठा समाजाच्या या आंदोलनाची सर्व तयारी मनोज जरांगे आणि आयोजकांकडून करण्यात आली असून, आता गुणरत्न सदवर्ते यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायालय काय निकाल देते हे बघावे लागणार आहे. तसेच, या याचिकेवर कालच सुनावणी घेतली जाण्याची मागणीही सदावर्तेंनी केली होती. मात्र, त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली असून, आता या याचिकेवर २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर, पंढरपूर पोलीसांत दाखल प्रकरणी जरांगे आणि त्यांच्या समर्थकांवर हत्येचा गुन्हा दाखल केला जावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.(Manoj Jarange)

Manoj Jarange | दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री जरांगेंशी साधणार संवाद

Manoj Jarange | मनोज जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नका 

तसेच, यावेळी बोलताना सदावर्ते म्हणाले की,”जरांगे हे मुंबईत येऊन मुंबई जाम करणार असल्याचे ते अगदी जाहीरपणे सांगत आहेत. शेअर मार्केटला टार्गेट करू आणि मंत्र्यांच्या घरातही घुसू असे ते सांकेतिक भाषेत सांगत आहेत. माझ्यासारख्या विरोध करणाऱ्यांची ते फक्त घरच जाळत नसून, आता ते मुंबईत येऊन दाखवणार असल्याचेही सांगत आहेत. त्यामुळे जरांगे यांना मुंबईत येऊच देऊ नये. अशी आमची मागणी असून, मुंबईला सुरक्षित ठेवावे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, याचीही काळजी घेतली पाहिजे. तसेच जरांगेसह त्यांच्या साथीदारांवरही हत्येचा गुन्हा दाखल करावा,”असेही सदावर्ते म्हणाले. (Manoj Jarange)

Manoj Jarange: आयच यडपट बुजगावण कुठल…; जरांगेनी भुजबळांची अब्रूच काढली

आंदोलन मोठं दाखवण्यासाठी माळी तरुणाची हत्या…

कुठल्याही हिंसक आंदोलनाला भारतीय संविधान हे मान्यता देत नाही. जरांगेंची सर्व माहिती आज न्यायालयात दिली आहे. त्यांनी कशाप्रकारे घरं जाळली, गाड्या फोडल्या याचीही माहिती देण्यात आली आहे. हे आंदोलन मोठं असल्याचं दाखवण्यासाठी माळी समाजाच्या एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचे घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. तसेच, या प्रकरणाचे कथित व्हिडिओ समोर आले असून, तेही न्यायालयात मांडलेले आहेत. या तरुणाची हत्या करून आत्महत्या असल्याचे दाखवण्यात आले आहे.” असे सदावर्ते यावेळी म्हणाले. (Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!