Skip to content

National youth fest | हा मान नाशिकला मिळाला ही अभिमानाची बाब – मंत्री दादा भुसे

National youth fest

National youth fest |  गेल्या पाच दिवसांपासून नशिकमध्ये सुरु असलेल्या केंद्रीय क्रीडा मंत्रालय आयोजित ‘२७ व्या राष्ट्रीय युवा’ महोत्सवाचा समारोप हा आज हनुमान नगरमधील ‘महा युवा ग्राम’ या रंगारंग कार्यक्रमाने झाला. देशाभरातून सुमारे ८,००० युवकांनी या महोत्सवात सहभाग घेतला. स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिकमध्ये प्रथमच या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. तब्बल १६ वर्षानंतर महाराष्ट्र या महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी मिळाली.

दरम्यान, आज या महोत्सवाचा समारोप सोहळा पार पडला असून, यासाठी राज्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह खासदार व आमदार उपस्थित होते. तसेच यावेळी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त ‘राज्य क्रीडा दिन’ साजरा करण्यात आला.(National youth fest)

Nashik | युवा हा देशाची ताकद अभिमान आणि स्वाभिमान – मंत्री दादा भुसे

National youth fest | ही नाशिकसाठी अभिमानाची बाब

दरम्यान, यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,”गेल्या चार दिवसात देशभरातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन तसेच वेगवेगळे अविष्कार बघायला मिळाले, नाशिककरांसाठी ही एक पर्वणीच होती. यंदाच्या या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा मान नाशिकला मिळाला ही अभिमानाची बाब आहे.

नाशिक ही धार्मिक भूमी आहे. येत्या २०२७ ला नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. त्या आधीच तरुणाईचा हा कुंभमेळा संपन्न झाला. आयोजनात काही कमी राहिली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. तसेच यावेळी दोन दिवस नाशिक मध्ये थांबून नाशिक जिल्ह्यात भ्रमंती करण्याची तसेच येणारा ‘कुंभ मेळा’ तसेच पर्यटनासाठी आपल्या कुटुंबांसोबत महाराष्ट्रात येण्याचे आवाहन यावेळी उपस्थित तरुणांना मंत्री भुसे यांनी केले आहे.(National youth fest)

PM Modi in Nashik | आई बहिनींवरून शिवीगाळ करू नका – पं. मोदी

येणाऱ्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही नेतृत्व कराल तुमच्या राज्यातील तरुणाईला दिशा देण्याचे कार्य तुमच्या हातून घडेल, सामर्थ्यशाली देशाचे तरुण घडविण्याचे कार्य तुमच्या हातात आहे. भारत हा तरुणांचा देश आहे, देशाच्या विकासात तरुणांचे योगदान जेवढं अधिक असेल तेवढंच देशाचं भवितव्य अधिक ऊज्वल असेल. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही स्वतःला झोकून दिले पाहिजे. या शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच यावेळी त्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आणि सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.(National youth fest)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!