Skip to content

Uddhav Thackrey | ….अन् आता राऊतांनी थेट मोदींचीच हिम्मत काढली

Uddhav Thackrey

Uddhav Thackrey |  राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान, आज ठाकरे गटातर्फे ‘महापत्रकार परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत ते शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर बोलणार आहेत. यासाठी ठाकरे गटाने काही मोठमोठ्या कायदेतज्ञांनाही बोलावले आहे.(Uddhav Thackrey)

दरम्यान, राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशी पत्रकार परिषद घ्यावी. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नाची उत्तरं दिलं नाहीत. मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, असे खुले आव्हान संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना दिले आहे.

तसेच यावेळी संजय राऊत म्हणाले की,  आज उद्धव ठाकरे यांची ‘महापत्रकार परिषद’ आहे. हा दरोडा कसा पडला?, आणि नेमकं काय झालंय? हे ते आज सांगणार आहेत. या महापत्रकार परिषदेत दिल्लीतील काही दिग्गज वकील कायदेतज्ञही उपस्थित असणार आहेत. देशातील कुठल्याही पत्रकाराने यावे आणि प्रश्न विचारावे. त्या सगळ्यांच्या प्रश्नणाची उत्तरं आज दिली जाणार आहेत.(Uddhav Thackrey)

Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे म्हणजे ‘सेल नसलेला रिमोट’!; कोण काय म्हणाले..?

Uddhav Thackrey | सरकारी पैशांनी शिंदेंची दावोस सहल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आहे. ते म्हणाल की, “सरकारी पैशांनी मुख्यमंत्र्यांनी दावोसला सहल काढली आहे. दावोसला इतका लवाजमा घेऊन जात आहेत. यात कोट्यावधींची उधळण सुरू आहे. आधी जे उद्योग गुजरातला गेले ते परत आणा. मग, आम्ही जनता फंडमधून तुमच्या दावोस दौ-याचा सर्व खर्च करू. हा सर्व बालिशपणा सुरू असून यांनी लोकशाहीचा खून केल्याची टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.(Uddhav Thackrey)

Uddhav thackrey | ‘मविआ’त वाद चिघळले; ठाकरे-काँग्रेसमध्ये खंडाजंगी..?

…हिंमत आमच्यात आहे. तुमच्यात आहे का?

राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशी पत्रकार परिषद घ्यावी. देशाचे पंतप्रधान मोदींनी १० वर्षात एकदा तरी पत्रकार परिषद घेतली का? त्यामुळे आमच्या पत्रकार परिषदेवर बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही.  जनतेच्या प्रश्नांचा सामना करण्याची हिंमत आमच्यात आहे. ती तुमच्यात आहे का? असा सवाल यावेळी संजय राऊतांनी विरोधकांना केला.(Uddhav Thackrey)

देशात बीजेपीपीठ हे नवपीठ 

देशात सध्या चार शंकराचार्य व एक नवपीठ तयार झाले आहे आणि त्याचे नाव ‘बीजेपीपीठ’ आहे. आता देशात मोदी जे करतील तेच होतंय. “मंदिर वही बनाएंगे” आम्ही ते पाडलं कुठे होतं आणि ते मंदीर बनतंय कुठे हे जाऊन पहा मग तुम्हाला मंदिर कुठे बनतंय हे कळेल, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली आहे.(Uddhav Thackrey)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!