Uddhav thackrey | ‘मविआ’त वाद चिघळले; ठाकरे-काँग्रेसमध्ये खंडाजंगी..?

0
36
Uddhav thackrey
Uddhav thackrey

Uddhav thackrey |  नव वर्षात राज्यात लोकसभा नवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. ह्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही चांगलीच कंबर कसली आहे. तसेच यानुसार बैठकी, सभा, नियोजनपर कार्यक्रमे, असे विविध कामे सुरू झाली आहेत. मात्र, यातच आता विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली असून, महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरुन खडाजंगी सुरु असल्याचे दिसत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने (Uddhav thackrey) लोकसभेच्या २३ जागांवर दावा केला. मात्र, काँग्रेस नेत्यांकडून हा दावा स्पष्ट फेटाळण्यात आला आहे. त्याशिवाय काँग्रेसने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघावरही दावा केला असून, ही जागा आपण सोडणार नसल्याचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सांगितले.

PM Modi | मोदी नाशकात; काय आहे मोदींच्या ह्या दौऱ्यामागचे ‘गुपित’

ठाकरेंच्या प्रस्तावाला काँग्रेसची केराची टोपली

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे २३ जागांची लिस्ट घेऊन काँग्रेसच्या वरिष्ठांकडे गेले असून, ते एकटेच जर एवढ्या जागा लढवणार असतील तर मग आम्ही काय करायचं? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. ठाकरे गटासोबतच वंचित बहुजन आघाडीनेही तब्बल बारा जागांवर दावा केला आहे अशी बातमी टीव्हीवर पाहिली. आणि जर, एवढ्या जागा तेच घेणार असतील तर बाकीच्यांनी काय करायचं? असा माझा प्रश्न आहे. इंडिया आघाडीत तुम्ही येत आहात, पण जागांची मागणी करताना जरा काळजी घ्यावी, असे संजय निरुपम यावेळी म्हणाले. (Uddhav thackrey)

Sharad Pawar | शरद पवारांनी रणशिंग फुंकले; लोकसभेच्या ‘ह्या’ जागा लढवणार

अशोक चव्हाण यांचाही ठाकरेंना विरोध 

काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे यावर म्हणाले की, “इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये एकी असणं हे फार गरजेचं आहे. तसेच प्रत्येकच पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. पण सध्याच्या स्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची थेट २३ जागांची मागणी ही खूपच जास्त होत आहे.

Uddhav thackrey | ठाकरे माघार घ्यायला तयार नाही

काँग्रेस पक्षाकडून उद्धव ठाकरे गटाचा लोकसभा निवडणुकीसाठीच्या २३ जागांचा प्रस्ताव हा नाकारण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे ठाकरे गट हे आपल्या मागणीवर ठाम आहेत. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी आम्ही तब्बल २३ जागांवर ठाम असल्याचे सांगितले आहे. यावेळी ते असेही म्हणाले की, “आम्ही इंडिया आघाडीत राज्यातील ४८ पैकी २३ जागा लढवण्यावर ठाम आहोत.(Uddhav thackrey)

मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागांवर विजय मिळाला होता ?. त्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त एकच विजयी जागा मिळाली होती. आणि ती जागाही बाळू धानोरकर यांची होती म्हणजेच शिवसेनेची होती. यावरून आता तुम्हीच समजून घ्या. कोणाला किती जागा हव्या आहेत? या सगळ्यावर आता शरद पवार, उद्धव ठाकरे राहुल गांधी, खर्गे हेच निर्णय घेतील. आणि उत्तर मुंबई काय काँग्रेस सगळ्याच जागा मागू शकतो, असेही यावेळी अरविंद सावंत हे म्हणाले आहेत.(Uddhav thackrey)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here