Skip to content

Deola | सभासदांचे हित हेच ‘प्रगती’चे हित; नवनिर्वाचित संचालकांची ग्वाही

Deola

Deola | सोमनाथ जगताप – देवळा सहकार क्षेत्रात अग्रगण्य अशा नामको बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्याने निवडणूक दिले आहे. यापुढेही आम्ही सर्व संचालक मंडळ बँकेच्या प्रगतीसाठी परिश्रम घेऊन सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून कामकाज करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित संचालक महेंद्र बुरड यांनी आज येथे केले.

Uddhav thackrey | ‘मविआ’त वाद चिघळले; ठाकरे-काँग्रेसमध्ये खंडाजंगी..?
नामको बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून, यात प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडणूक आले. यात सटाणा-देवळा तालुक्यातील विजयी उमेदवार महेंद्र बुरड यांचा देवळा तालुक्यातील सभासदांनी सत्कार केला आणि यावेळी ते बोलत होते.

PM Modi | मोदी नाशकात; काय आहे मोदींच्या ह्या दौऱ्यामागचे ‘गुपित’

(Deola Namco Election)

यावेळी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक भाऊसाहेब पगार, शेतकरी संघाचे अध्यक्ष कैलास देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर, सुराणा पतसंस्थेचे संस्थापक माजी उपाध्यक्ष अशोक सुराणा, शरदराव पवार पतसंस्थेचे व्हा. चेअरमन हिरामण आहेर, कीर्तन केसरी ह. भ. प. संजय धोंडगे, मेतकर पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मेतकर, नगरसेवक संतोष शिंदे, दोस्ती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ पुरकर, दिलीप आहेर, डॉ किरण आहेर, संजय गायकवाड, जयेश संकलेचा, अनिल आहेर, सचिन सुर्यवंशी, राजेंद्र आहेर, बाळासाहेब गुंजाळ, अतुल आहेर, संभाजी शेजवळ, साहेबराव आहेर, गोरख आहेर, कपिल अहिरराव, दादाजी आहेर, मयूर आहेर, आबा शेवाळकर, कर्मचारी आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!