Skip to content

Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे म्हणजे ‘सेल नसलेला रिमोट’!; कोण काय म्हणाले..?

Ram Temple

Uddhav Thackrey |  राज्याच्या राजकारणात सध्या टीकांचे आणि आरोप प्रत्यारोपांचे राजकारण हे सध्या सुरू आहे. दरम्यान, आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्यावर “त्यांचा जो रिमोट आहे, त्याचा सेल गेल्यामुळे ते आता काहीही बोलत नाही. त्यामुळे आमच्या सारख्यांनाच आता उत्तर द्यावे लागते” अशी खोचक टीका शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मध्यमांशी ते बोलत होते.(Uddhav Thackrey)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना आमदार संजय शिरसाठ म्हटले की, “शिवसेनाप्रमुखांनी उभी केलेली ही संघटना इतकी लाचार होऊ शकते की, या पक्षाचा नेता हा कुठे गेला याची कल्पनाच नसताना इतर पक्षातील नेते कुठे गेले, आणि कधी येणार आहेत, कधी कोणाला भेटणार आहे. यावर चर्चा होतांना बघायला मिळत आहे. पण, लाचारी पत्करायची तरी किती, याबद्दलच आम्हाला वाईट वाटतंय.(Uddhav Thackrey)

Nathuram Godse | नथुराम गोडसेंच्या ‘अस्थी’ दर्शनासाठी नाशिककरांची खास यात्रा

इतरांना बेईमान, धोकेबाज, आणि गद्दार अशी नावं ठेवतात. मात्र, बंदर म्हणतो मेरी लाल, यापद्धतीने ते आजहीआपली लाल करून घेण्याचा प्रयत्न करतात. राज्यच्या संस्कृतीत यांच्या टिकेचे शब्द हे बसत नाहीत, असेही यावेळी संजय शिरसाट म्हणाले आहेत. पण यावेळी उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख न करता, “त्यांचा जो रिमोट आहे, त्यातील सेलच संपले आहेत. त्यामुळे तेही काही बोलत नाही,” असा शाब्दिक टोला संजय शिरसाठांनी लगावला.

Uddhav Thackrey | खोटं बोल, पण रेटून बोल

शरद पवार गटातील नेते जयंत पाटीलांची भाजपसोबत बोलणी सुरु होती, व त्याचमुळे आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा थांबवलेला होता, असे संजय शिरसाट हे रविवारी म्हणाले होते. तसेच यावर उत्तर देतांना जयंत पाटील म्हणाले की, “शिरसाट यांच्या बोलण्याचा नेमका उद्देश काय हे मलाच माहित नाही, माझं आणि शिरसाटांचं या विषयावर बोलणंच झालेलं नाही. असे स्पष्टीकरण दिले असता, आता यानंतर आता पुन्हा शिरसाट यांनी जयंत पाटील यांना प्रतिउत्तर दिले आहे.

Sudhakar Badgujar | बडगुजरांना जामीन मंजूर; पोलीस चौकशीची टांगती तलवार मात्र कायम

“जयंत पाटीलांना माहितीय की, मी खोटं बोलत नाहीये. मी काय संजय राऊत नाही. मी कुठलंही वेडंवाकडं स्टेटमेंट करतच नाही. जयंत पाटील हे सध्या रेटून खरं बोलत आहेत आणि त्यांनी छातीवर हाथ ठेवून सांगावे, लोक सगळंच विसरत नाहीत, लोकांच्या सगळं लक्षात राहते. त्यामुळे “खोटं बोल, पण रेटून बोल” असे वागू नका. मी खरंच बोललो आहे आणि याचे पुरावेदेखील मी देऊ शकतो,” असे यावेळी आमदार संजय शिरसाट हे म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!