Nashik News | नाशिक मनपाकडून नाशिककरांना मिळणार मोठी सुविधा

0
3
Sanjay Raut
Sanjay Raut

Nashik News | नाशिक आता डिजिटल शहर होण्याच्या वाटचालीकडे पाऊल टाकत आहे. त्यामध्येच आता नाशिक महानगरपालिका आपल्या मालमत्तेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार एका क्लिकसरशी ट्रॅक करण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक महापालिकेने केलेल्या जीआयएस मॅपिंगचे पहिल्या टप्प्यामधील साडे पाच लाख मालमत्तेच ड्रोन सर्वेक्षण संपूर्ण झाले आहे.

Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे म्हणजे ‘सेल नसलेला रिमोट’!; कोण काय म्हणाले..?

Nashik News | ‘जीआयएस’ (जिओग्राफीकल मॅपिंग सिस्टम) मॅपिंग

राज्य शासनाने २०१९ या वर्षापासून शहर विकास आराखडा तयार करताना ‘जीआयएस’ (जिओग्राफीकल मॅपिंग सिस्टम) मॅपिंग करणे हा बंधनकारक करण्यात आला आहे. नाशिक महापालिकेचा शहर विकास आराखडा हा २०१७ या सालामध्ये करण्यात आला होता. त्यामुळे शहर विकास आराखड्याचा नकाशा हा द्विस्तरीय पध्दतीचा करण्यात आला असून नाशिक महापालिकेने भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे शहरातील रस्त्यांचे जमीन योजना (लॅण्ड प्लॅन ॲन्ड लॅण्ड शेड्यूल) प्रमाणिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Corona Update | त्र्यंबकेश्वर, सिन्नरपाठोपाठ शहरातही कोरोनाचा वाढतोय कहर!

महापालिकेने या उपक्रमासाठी एका खासगी संस्थेला काम दिले आहे. महापालिका हद्दीत मध्ये जीपीएस मॅपिंग करण्यासाठी जवळपास २७० चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. शहरातील मालमत्ता, रस्ते आदींची माहिती संकलित करून जीआयएस मॅपिंगवर टाकली आहे. तसेच सरकारी मालमत्तेचे आर्टिलरी सेंटर, पोलिस अकादमी, सीएनपी आणि आयएसपी, विभागीय आयुक्त कार्यालये, केंद्रीय कार्यालये या सुरक्षेच्या स्थळांचेदेखील जीआयएस मॅपिंग पूर्ण झाले आहे.

संकलित झालेली माहिती महापालिकेच्या वेबसाइटवर अपलोड करत असताना डेटा करप्ट झाल्याने पहिल्यापासून सर्वं तयारी करण्याची वेळ आली होती. दरम्यान, करप्ट झालेला डेटा हा रिकव्हर करण्यात आला आहे. पंचवटी विभागातील मानूर आणि पंचक या दोन गावांमध्ये पुढील सर्वेक्षण होणार असून महापालिकेच्या अथक प्रयत्नानंतर डाटा रिकव्हर करण्यामध्ये यश आल्यानंतर आता ड्रोनद्वारे झालेले जिओग्राफीकल सर्वेक्षणाची उलट पडताळणी करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here