Igatpuri | टाकेद गटात महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन

0
33
Igatpuri
Igatpuri

इगतपुरी : सिन्नर-इगतपुरी मतदार संघातील टाकेद गटातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे विविधांगी प्रश्न सुटावे व त्यांच्या समस्यांचे स्थानिक ठिकाणीच निराकरण व्हावे. यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकेद गटातील सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर यांना नागरिकांच्या रेशनकार्ड इष्टांक ऑनलाइन डाटा एन्ट्री प्रश्नासंदर्भात निवेदन दिले होते. यानंतर दोन दिवसांतच इगतपुरी तालुक्याला जवळपास दहा हजार इष्टांक कोटा उपलब्ध झाला व शिंदे यांच्या निवेदनावर लगेचच तहसीलदार बारावकर यांनी पूर्व भागातील टाकेद गटात महाराजस्व शिबिराचे आयोजन करण्यासाठी आदेश काढला आहे.

बुधवार ता.31 जुलै रोजी टाकेद गटातील जवळपास चाळीस वाड्या वस्त्या व पंचवीस ग्रामपंचायत कार्यक्षेत्राचे मिळून एकमेव मध्यवर्ती केंद्रबिंदू असलेल्या सर्वतीर्थ टाकेद येथे या भव्य महाराजस्व अभियान शिबिराचे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजन केले आहे. दरम्यान या भव्य महाराजस्व अभियानात इगतपुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे सहपंचायत समिती घरकुल विभाग, रोजगार हमी योजना विभाग, महिला व बालविकास प्रकल्प विभाग, स्थापत्य व बांधकाम विभाग, पंचायत समिती कृषी अधिकारी, यानंतर इगतपुरी तहसील पुरवठा विभाग, संजय गांधी योजना विभाग, तालुका कृषी अधिकारी विभाग, तालुका वैद्यकीय अधिकारी विभाग, भूमी अभिलेख उपअधीक्षक व कर्मचारी,

Igatpuri | बांबळेवाडीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा; जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सर्व संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, सर्व गावचे ग्रामसेवक, यांचे सह स्थानिक परिसरातील सर्व ई सेवा सेतू कार्यालय संचालक मंडळ, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी या सर्वच विभागाचे सर्व पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग या महाराजस्व शासन आपल्या दारी अभियानात उपस्थित राहणार असून, तशा सूचना तहसीलदार अभाजीत बारावकर यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या आहेत.

यामध्ये लाडकी बहीण, एकल पालक, घरकुल, कृषी संदर्भात विहीर, शेतकी अवजारे, विहीर, रोजगार हमी योजना,  घरकुल हफ्ते, शौचालय बांधकामे, जॉब कार्ड, नाला बर्डिंग, गुरांसाठी गोठा, शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित मोजणी नकाशे, गावठाणातील मालमत्ता पत्रक, प्रॉपर्टी कार्ड, सी.टी सर्व्हे, नागरिकांना आयुष्यमान भारत योजना, आभा कार्ड, गोल्डन कार्डचे वाटप आरोग्य संबंधित विविध योजना, शिधापत्रिकासंदर्भात नवीन रेशनकार्ड दुय्यम शिधापत्रिका, नाव समावेश नाव कमी, ऑनलाइन डाटा एन्ट्री धान्य चालू करणे,

Igatpuri | टाकेद गट शिष्टमंडळाने घेतली आमदार कोकाटे यांची भेट; विविध विकासकांमांचा घेतला आढावा

अर्ज जमा करणे, सेतू कार्यालय सर्व शासकीय योजनांचे फॉर्म उपलब्ध ठेऊन प्राप्त अर्ज ऑनलाइन करणे, आधार किट लावून आधार प्रमाणीकरण करणे, शेतकऱ्यांच्या सात बारा संबंधित फेरफार नोंदी निर्गमित करणे, वारसा नोंदी, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखले, दारिद्र्य रेषेखालील दाखले, घरकुल योजनेच्या याद्या, यांसह सर्वच विभागाशी संबंधित असलेली विविध शासकीय योजनांची नागरिकांना संबंधित अधिकारी वर्गाकडून माहिती व लाभ या शिबिरात मिळणार आहे. तशा सूचनादेखील संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

तरी या भव्य महाराजस्व अभियान शिबीरात टाकेद गटातील सर्व ग्रामपंचायत गाव वाड्या वस्त्यांमधील ज्यांचे ज्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अश्या सर्व ग्रामस्थ नागरिकांनी उपस्थित राहून आपापल्या प्रश्नांची तालुक्याच्या ठिकाणी न जाता आपल्या स्थानिक ठिकाणी अयोजित केलेल्या शिबिर कार्यक्रमात सोडवणूक करून घ्या, स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनीदेखील या शिबिराबाबत स्थानिक नागरिकांना सूचना द्या व सर्वांनी या शिबिराला उपस्थित राहा असे आवाहन आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून करण्यात येत आहे.

“टाकेद गटातील कोणत्याही गावातील शेतकरी ग्रामस्थांचा कोणताही प्रलंबित प्रश्न असेल याचे या आयोजित केलेल्या महा स्वराज्य शासन आपल्या दारी अभियानात जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांचा समोरच मार्गदर्शन करून निराकारण केले जाणार आहे तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.”
– माणिकराव कोकाटे (आमदार, सिन्नर-इगतपुरी विधानसभा)

“नागरिकांचे विविध प्रश्न स्थानिक ठिकाणी सोडविण्यासाठीच टाकेद येथे महा राजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शिबिरात सूचना आदेश दिल्याप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक संबंधित विभागाचे सर्व अधिकारी हे नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडविण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित राहतील.”
– अभिजित बारावकर (तहसीलदार, इगतपुरी)

“शासनाच्या विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे दाखल्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी अवाजवी वेळ पैसा खर्च करून जाण्याऐवजी आपल्या प्रत्येक प्रश्नांसाठी स्थानिक ठिकाणीच शासन आपल्या दारी महा राजस्व अभियान शिबिराचे आयोजन केले असून प्रत्येकाने या भव्य शिबिरात आपापले विविध प्रश्न जागेवरच संबंधित विभाग प्रशासन अधिकारी यांचेकडून प्रश्न समजून सोडवून घ्यावेत.”
– राम शिंदे, (सामाजिक कार्यकर्ते, टाकेद)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here