Skip to content

Latur Crime | जिगरी मित्रच निघाला आईचा प्रियकर; म्हणुन झोपेतच संपवले

Latur Crime

Latur Crime | राज्यात दिवसेंदिवस क्षुल्लक कारणांवरून खुनांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना ही लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील वडजी या गावात घडली असून येथे एका तरुणाचा रात्री झोपेत असतानाच त्याच्या डोक्यात आणि गळ्यावर वार करत त्याचा निर्घुणपणे खून केल्याची घटना ही शनिवारी उघडकीस आली होती. तसेच आईसोबत अनैतिक संबंधांचा संशय आला असल्याने मृत तरुणाच्याच मित्रानेच त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून रणजित माळी असं मृत तरुणाचे नाव आहे.

Nashik News | नाशिक मनपाकडून नाशिककरांना मिळणार मोठी सुविधा

नेमकं घडलं काय ?

या प्रकरणाने लातूर तालुक्यासह राज्यात खळबळ माजली असून या घटनेतील मृत रणजित हा अविवाहित असून आई-वडीलांना शेती व्यवसायात मदत करून दुग्ध व्यवसाय करत होता. शुक्रवारी नेहमीप्रमाणे रणजित हा आपल्या शेतात मुक्कामी गेला असता रात्री उशिरा वा पहाटेच्या वेळी अज्ञात मारेकऱ्याने रणजित झोपेत असताना रणजित डोक्यात आणि गळ्यावर अत्यंत क्रूरपणे धारधार कोयत्याने वार करून रणजितचा खून करण्यात आला. ही घटना शनिवारी रोजी सकाळी उघडकीस येताच याची माहिती भादा पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर या घटनेतील पुढील तपास पोलिस करत आहे.

Latur Crime |…त्या मुलाने खुनाची कबुली दिली

दरम्यान, भादा पोलिसांकडून गावात चौकशी सुरु असतानाच मृत रणजितचे एका स्त्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि या स्त्रीचा मुलगा रणजितचा खूप जवळचा मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ एका 17 वर्षीय मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, या चौकशीदरम्यान या तरुणाने गावातील एका मुलाकडून कोयत्याला धार लावून नेल्याची कल्पना पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी त्या मुलाची कसून चौकशी केली असता त्या मुलाने खुनाची कबुली दिली आहे.

Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे म्हणजे ‘सेल नसलेला रिमोट’!; कोण काय म्हणाले..?

रणजित आणि आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याचा संशय

मृत रणजित आणि आरोपी दोघेही चांगले मित्र होते आणि त्यामुळे एकमेकांच्या घरी त्यांचे येणेजाणे असायचे. दरम्यानच्या गेल्या काही काळात रणजित आणि आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला आला असता त्याने काही दिवस या दोघांवर पाळत ठेवत खात्री केली. त्यामुळे मृत रणजितला कायमचे संपवण्याचा त्याने निर्णय घेतला आणि त्यानुसार कोयत्याच्या आधाराने रात्री रंजित गोठ्यात झोपला असतानाच रणजितचा खून केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!