Nashik | संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाचे नाशिकमध्ये वाढते कार्यक्रम बघता ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधनी सुरू असल्याचे म्हटले जात आहे. स्वराज्य पक्षाच्यावतीने युवक जिल्हाप्रमुख यांच्या संकल्पनेतुन ‘स्वराज्य छत्री वाटप अभियान’ सुरु करण्यात आले असुन आशा सेविका व ज्येष्ठ नागरीकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, राज्यकार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात, नगरसेवक दिपक दातीर, मुख्याध्यापक अरुण दातीर हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना पक्ष व छत्रपतींचे विचार मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मांडले. मुख्याध्यापक अरुण दातीर यांनी बोलताना स्वराज्य पक्षाच्या कामाचे कौतुक केले भावी वाटचालीसाठी व शुभेच्छा दिल्या. तर, पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत नाशिक हा स्वराज्य पक्षाचा बालेकील्ला आहे व जिल्हाप्रमुखांनी आणखी जोमाने काम करावे, असे केशव गोसावी म्हणाले.
डॉ.रुपेश नाठे यांनी बोलताना सर्व आशा सेविकांचे कोविडमधील कामाचे कौतुक करत त्यांचा ‘देवदुत’ असा उल्लेख केला. स्वराज्य पक्षाची समाजसेवा व विचार हेच आमच राजकीय पठबळ असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
Nashik Politics | नाशिक जिल्ह्यातील ‘या’ सात जागांवर ठाकरे गट दावा करणार..?
यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे, राज्य कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात, नगरसेवक दिपक दातीर, मुख्याध्यापक अरुण सर दातीर, साहेबराव दातीर, विद्यार्थी जिल्हाप्रमुख आघाडी सागर पवार, महानगरप्रमुख रोशन खैरे, सुलोचना भोसले, रेखा जाधव, रागिनी जाधव, संघटक संदीप आवारे, जिल्हा कार्याध्यक्ष युवक गजानन हराळ, उपमहानगर प्रमुख अंकुश सावखेडे, प्रदीप शिंदे, योगेश शेजवळ, तालुका प्रमुख समाधान चव्हाण ,विजय चुंबळे, युवक तालुका प्रमुख समाधान जाधव, रवींद्र दातीर, नितीन सामोरे, पवन दातीर, प्रवीण खैरनार, राहुल कापसे लक्ष्मण हनवते, बंटी दातीर, अमोल मुंगसे, समाधान गोवर्धने, गणेश अहिरे, हरीश मोहोळ, मोहन कसबे, आदी उपस्थित होते.
स्वराज्य पक्ष राजकारणात आहे व विधानसभा लढवणार आहे. परंतु सामाजिक कार्य करत असताना त्यात राजकीय हेतु नसुन या समाजाच आपण देणं लागतो या हेतुने करत आहोत. नितीन दातीर नगरसेवक व्हावे ही नागरीकांची अपेक्षा आहे.
– रुपेश नाठे (जिल्हाप्रमुख, स्वराज्य पक्ष)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम