Skip to content

Nashik | युवा हा देशाची ताकद अभिमान आणि स्वाभिमान – मंत्री दादा भुसे

Nashik

Nashik |  राष्ट्रीय क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून नाशिक येथे सुरू असलेल्या ‘२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवा’साठी कालिदास कलामंदिर येथे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे हे आज उपस्थित होते.(Nashik)

दरम्यान, यावेळी उपस्थित असलेल्या सहभागी विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री भुसे म्हणाले की, “युवा हा देशाची ताकद अभिमान आणि स्वाभिमान आहे. युवा महोत्सवाच्या निमित्ताने आज या तरुणाईचा कुंभमेळा हा मोठ्या उत्साहात संपन्न होत असून, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे”.

नाशिक शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी देशभरातून विविध राज्यातील विद्यार्थी हजारोंच्या संख्येने नाशिक शहरात दाखल झालेले आहेत. चार दिवस सुरू असलेल्या या युवा महोत्सवासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम सुरू आहेत.(Nashik)

यावेळी मंत्री भुसे यांनी कालिदास कलामंदिर तसेच उदोजी मराठा हायस्कूल या ठिकाणी भेट दिली. तसेच मंत्री भुसे यांनी यावेळी विद्यार्थ्यांमध्ये बसून सहभागी विद्यार्थ्यांचे अविष्कार आणि कला प्रकार बघितले. यात महाराष्ट्राची लावणी तसेच पंजाब राज्याचे भांगडा हा नृत्याविषकार बघितला.

उदोजी मराठा हायस्कूल येथे सुरू असलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन कार्यक्रमालाही त्यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना ९ शिंदे गट) जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते,  क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Nashik)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!