Dhule Loksabha | धुळे लोकसभेतील इच्छुकांच्या गर्दीत अविष्कार भुसे ठरताय लोकप्रिय…

0
5
Dhule Loksabha
Dhule Loksabha

तनुजा शिंदे : Dhule Loksabha | हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असून, आता या महिन्यात कधीही लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. राज्यातील काही जागांचा तिढा हा दोन्ही गोटात कायम आहे. त्यात मुख्य मतदार संघ म्हणजे धुळे लोकसभा मतदार संघ. या लोकसभेच्या जागेवर तब्बल नऊ उमेदवार हे टिकीटासाठी इच्छुक आहेत. दरम्यान, हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून, येथे गेल्या दोन टर्मपासून डॉ. सुभाष भामरे हेच खासदार म्हणून निवडून येत आहेत.

धुळे लोकसभा मतदार संघामध्ये धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर, मालेगाव बाह्य मतदार संघ व सटाणा या ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आधीच्या निवडणुकांमध्ये या मतदारसंघात शिवसेनेच्या पाठिंब्याचा भाजपला फायदा होत होता. दरम्यान, या मतदार संघातील इच्छुक उमेदवारांपैकी कोणचे पारडे किती जड असणार आहे हे बघूयात…

डॉ. सुभाष भामरे –

दरम्यान, धुळे मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची धुळे लोकसभा मतदार संघातून हॅटट्रिक करण्याची तयारी असून, तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गेली दहा वर्षे त्यांची या मतदार संघात तर, त्यांच्या पक्षाची राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही त्यांना मतदार संघात फारसे प्रभावी काम करता आले नाही. त्यामुळे जनतेसोबतच पक्षातही त्यांच्याविषयी नाराजीचा सुर आहे. एकूणच त्यांच्याबाबतची प्रतिकूल परिस्थिती पाहता त्यांची वाट जरा बिकटच आहे.(Dhule Loksabha)

Dhule Loksabha | जनतेच ठरल…!, मालेगावचे ‘भाईजी’ दिल्लीत पाठवणार.!

डॉ. प्रतापराव दिघावकर – 

यानंतर नंबर लागतो भाजपचे दुसरे इच्छुक उमेदवार निवृत्त पोलीस अधिकारी डॉ. प्रतापराव दिघावकर यांचा, हे मूळचे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदार संघात त्यांचा प्रभाव असला तरी, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने इतर ठिकाणी मात्र त्यांची बाजू कमकुवतच आहे. त्यांचा जनसंपर्क आणि लोकप्रियता देखील कमी आहे. याशिवाय आधीच भाजपकडून विद्यमान खासदार इच्छुक असताना दिघावकरांना संधी दिल्यास पक्षात अंतर्गत कलह निर्माण होऊ शकतो. प्रशासकीय अनुभव वगळता राजकीय समीकरण जुळविण्यात त्यांचे कसब नाही. यामुळे त्यांची उमेदवारी भाजपसाठी जास्त मेहनत घेण्यास भाग पाडेल.

Dhule Loksabha | धरती देवरे

धुळे मतदार संघातून उमेदवारीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत भाजप नेत्या आणि धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांचेही नाव चर्चेत आहे. धरती देवरे या भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष तथा नवसारी येथील खासदार सी. आर. पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांचे वडील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीसाठी ही बाजू बळकट असली, तरीही त्या जनतेसाठी उपलब्ध होऊ शकलेल्या नाही. तसेच त्यांची लोकप्रियता देखील कमी असल्यामुळे त्यांचे पारडे हलकेच आहे. (Dhule Loksabha)

Loksabha Election | लोकसभा निवडणूक कधी? मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

डॉ. तुषार शेवाळे

या मतदार संघात काँग्रेसकडून देखील तीन उमेदवार इच्छुक असून, यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे  नाव यादीत आघाडीवर आहे. गेल्या १५ वर्षांपूर्वी तब्बल ५० वर्षे हा मतदार संघ काँग्रेसच्याच ताब्यात होता. धुळ्यातून काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये डॉ. शेवाळे हे नाव आघडीवर आहे. मात्र, काँग्रेसची झालेली पडझड आणि कार्यकर्ते तसेच खंबीर नेतृत्वांची कमी लक्षात घेऊन इच्छाशक्ती आणि नेतृत्व असूनही त्यांचे या घोडदौडीत टिकणे जरा कठीणच असेल.

आमदार कुणाल पाटील 

काँग्रेस आमदार कुणाल पाटील हे जिल्ह्यातील एक शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. मात्र, असे असले तरी त्यांना विधीमंडळात फार काही करता आले नसून, ते त्यांच्या मतदार संघापूरतेच मर्यादित आहे. नाशिकमधील मालेगाव आणि सटाणा या मतदार संघात तर त्यांचा वावरही नाही. त्यामुळे त्यांचे देखील या लोकसभेच्या शर्यतीत  टिकण्याची शक्यता कमीच आहे.(Dhule Loksabha)

अविष्कार भुसे 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे सुपुत्र अविष्कार भुसे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. मागील टर्मला दादा भुसे हे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र, त्यांच्या नावाचा आधार न घेता अविष्कार भुसे यांनी त्यांची एक वेगळी ओळख तयार केली आहे. येथील तरुणाईत त्यांची क्रेझ असून, ते तरुणांसाठी हक्काचे नेतृत्व आहे.

मतदार संघातील तळागाळापर्यंत पोहोचलेले असून, ते 24/7 जनतेसाठी सहज उपलब्ध आहेत. फक्त हिंदुच नाहीतर, मुस्लिम समाजातही त्यांचे कार्यकर्ते असून, ते सर्वधर्मीयांच्या मनातील एक विनम्र उमेदवार आहेत. त्यांची वाढती लोकप्रियता, कार्यकर्त्यांचे जाळे, धडाडीपणा आणि प्रत्येक जनसामान्यांसाठी सहज उपलब्ध असणे या सर्व बाबी पाहता अविष्कार भुसे हे धुळे लोकसभा मतदार संघासाठीचे एक तगडे आणि इतरांपेक्षा उजवे उमेदवार ठरणार आहेत.(Dhule Loksabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here