Dhule Loksabha | जनतेच ठरल…!, मालेगावचे ‘भाईजी’ दिल्लीत पाठवणार.!

0
4
Avishkar Bhuse
Avishkar Bhuse

Dhule Loksabha |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांची नावे ही चर्चेत आहेत. त्यापैकी धुळे लोकसभेसाठी सर्वाधिक चर्चेतील नाव म्हणजे मंत्री दादाजी भुसेंचे चिरंजीव ‘अविष्कार भुसे‘ यांचे. एक जनसामान्यांतील लोकप्रिय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. आविष्कार भुसे हे सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले असून, सध्या सोशल मिडियावर त्यांचाच बोलबोला पाहायला मिळतोय.

आविष्कार उर्फ भाईजी हे सध्या युवासेना उत्तर महाराष्ट्र सचिव या पदावर कार्यरत असून, त्यांच्या आविष्कार भुसे फाउंडेशनच्या माध्यमातून ते लोकांचे प्रश्न सोडवत असतात. लोकांच्या मनातील तसेच तळागाळापर्यंत त्यांच्या कार्याच्या माध्यमातून पोहोचलेले असून, त्यांनाच धुळे लोकसभेची उमेदवारी मिळावी. याकरिता चक्क मालेगावसह धुळ्यातील तरुणांनी एकत्र येत त्यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. (Dhule Loksabha)

Dhule Loksabha | हिंदू धर्मभिमानी युवा

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांचे एक हक्काचे नेतृत्व म्हणून अविष्कार भुसे यांच्याकडे पाहिले जाते. स्वतःच्या संघटना कौशल्यातून त्यांनी मालेगावच्या युवकांना एकवटवले असून, त्यामुळे तरुणाईमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. खेळांच्या विविध स्पर्धा भरवुन ते उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. तसेच मालेगावमध्ये फिरता कीर्तन महोत्सव तसेच पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातूनही त्यांनी मालेगाव, नाशिक, धुळे येथील भाविकांना कीर्तन आणि कथेची मेजवानी उपलब्ध करून दिली होती.

Dada Bhuse | टवाळखोरांच्या धिंड काढा; पालकमंत्र्यांचे पोलिसांना कठोर निर्देष

तसेच वणी गडाच्या चैत्रयात्रेला जाणाऱ्या खान्देशातील भाविक भक्तांना मालेगावात काही समाजकंटकांडून त्रास दिला असता, समाजबांधवांना सुरक्षित वाटावे यासाठी स्वतः त्या यात्रेत सहभागी होऊन त्यांनी भाविकांचे आत्मबल उंचावले होते. त्यामुळे ‘हिंदू धर्मभिमानी युवा’ अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आणि तरुणांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि सर्व सर्वसामन्यांच्या मनातील आवाज हा दिल्लीत पोहचवून अविष्कार भुसेंना धुळे लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी तरुणांनी केली आहे.

दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदार संघातून अविष्कार भुसे यांना उमेदवारी देण्यात यावी व त्यांना दिल्लीत पाठवण्यासाठी शिवसेना युवासेना मालेगाव शहर व ग्रामीण पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही स्थानिक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखुशीने एकत्र येऊन त्यांच्या उमेदवारी संदर्भात बैठक घेऊन त्यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. (Dhule Loksabha)

Dada Bhuse | मंत्री दादा भूसेंनी मांडला राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अहवाल

अविष्कार भूसेंच्या दिलदार आणि दमदार नेतृत्वाला लोकांची पसंती

इच्छुक उमेदवारांची रांग असली तरी हजारो तरुणांच्या पसंतीला हे तरुण नेतृत्व इतर उमेदवारांपेक्षा उजवे ठरतंय. तर, सोशल मिडियावरही सगळीकडे त्यांचाच बोलबाला पाहायला मिळतोय. एवढंच नाहीतर त्यांच्या ‘भावी खासदार’ असा उल्लेख असलेल्या अनेक पोस्टही झळकत आहेत.

दरम्यान, धुळे लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या एका पोलमध्येही आविष्कार भुसे हेच आघाडीवर असून, त्यानंतर धुळ्याचे माजी खासदार सुभाष भामरे हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एकूणच आविष्कार भूसे हे विरोधकांसाठी एक तगडे आव्हान ठरणार असून, इच्छुक उमेदवारांच्या या चढाओढीत आविष्कार भूसेंच्या दिलदार आणि दमदार नेतृत्वाला लोकांची पसंती असल्याचे दिसत आहेत. (Dhule Loksabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here