Loksabha Election | आता सेलेब्रिटी आणि क्रिकेटपटूही लोकसभेच्या आखाड्यात..?

0
2
Loksabha Election
Loksabha Election

Loksabha Election | हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असून, आपापल्या पक्षांचा डंका वाजवण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. मात्र भाजपने चक्क अभिनेते आणि क्रिकेटपटूंनाच लोकसभा निवडणुकांचा चेहरा बनवण्याचे ठरवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकींसाठी भाजपकडून एक सुप्रसिद्ध अभिनेते आणि क्रिकेटपटू हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत भाजपच्या गोटात  उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून,पहिल्या टप्प्यात १३० उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे.

या निवडणुकांच्या मैदानात भाजप अभिनेता अक्षय कुमार आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेटपटू युवराज सिंह हा पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतो. तर, यासोबत अभिनेता अक्षय कुमार हा भाजपकडून चंदिगड किंवा दिल्लीमधील एखाद्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतो. यानंतर भाजपच्या माजी खासदार व अभिनेत्री जयाप्रदा यांना दक्षिण भारतातील एका मतदारसंघातून संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Dhule Loksabha | जनतेच ठरल…!, मालेगावचे ‘भाईजी’ दिल्लीत पाठवणार.!

Loksabha Election | भाजपच्या बैठकीत काय ठरले?

२९ फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्ली येथे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक पार पडली असून, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच यांच्यासह पक्षाचे काही प्रमुख नेते देखील उपस्थित होते. रात्री उशीरापर्यंत येथे खलबतं सुरु होती. तर, या बैठकीत पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी ही लवकरात लवकर जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Loksabha Election | महाविकास आघाडीत कोणाच्या वाट्याला कोणता मतदारसंघ..?

या उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपच्या काही सामर्थ्यशाली नेत्यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, या यादित पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह, राजनाथ सिंह यांची नावे असण्याचि शक्यता आहे. तसेच या यादीत सेलिब्रिटींचाही समावेश असणार आहे. आतापर्यंत भाजप क्रिकेटर्सच्या पत्नी किंवा सेलिब्रिटींच्या नातेवाईकांनाच संधी देत असल्याचे दिसत होते. मात्र, आता थेट सेलिब्रिटच भाजपकडून निवडणुकांच्या आखाड्यात उतरवले जाणार असल्याची चर्चा आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here