Dada Bhuse | टवाळखोरांच्या धिंड काढा; पालकमंत्र्यांचे पोलिसांना कठोर निर्देष

0
7
Dadaji Bhuse
Dadaji Bhuse

Dada Bhuse |  नाशिक शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच असून, याबाबत आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पोलिसांना कठोर निर्देष दिले आहेत. तसेच येत्या आठवड्याभरात टवाळखोरांवर वचक बसवण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना देखील मंत्री भुसे यांनी दिल्या आहेत. यावेळी त्यांनी गेल्या महिनाभरात किती गंभीर गुन्हे घडले याची दखल घेतली या बैठकीला उपायुक्त मोनिका राउत, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव, जिल्हाधिकारी जलज शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

Dada Bhuse | मला शहरात शांतता हवी आहे 

दरम्यान, यावेळी पालकमंत्र्यांनी यासाठी पोलिसिंग वाढविणे, दामिनी पथक सक्रिय करणे, शहरातील ब्लॅक स्पॉट शोधून कोंबिंग करून सराईत गुन्हेगार शोधून त्यांची कसून चौकशी करणे आणि अवैध धंदे तातडीने बंद करून मला शहरात शांतता हवी असून, त्यासाठी सर्वोतोपरी यंत्रणा राबविण्याचे सख्त निर्देष मंत्री भुसे यांनी केले. येत्या आठ दिवसांत कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याच्या सूचनाही दिल्या असून, जे दोषी आणि उपद्रवी असतील त्यांची थेट धिंड काढण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्यात.(Dada Bhuse)

Nashik Crime | नाशिकच्या सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिकावर गुन्हा दाखल

माझ्यापर्यंत तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्या 

तसेच यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयालाही भेट दिली. यावेळी त्यांनी “स्वच्छता बऱ्यापैकी राखली जात असून, त्यात आणखी वाढ करणे अपेक्षित आहे. तसेच रुग्णांना लवकरात लवकर आणि चांगल्या दर्जाचे उपचार देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करा, आरोग्य सेवा सुरळीत असून त्यात आणखी सुधारणा” करण्याचे निर्देष त्यांनी प्राशसनाला दिले. तसेच यावेळी त्यांनी ‘माझ्यापर्यंत तक्रारी येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला केल्या. (Dada Bhuse)

Nashik Crime | नाशिकमध्ये नामांकित हॉस्पिटलच्या ICU मध्ये डॉक्टरवर हल्ला

सुसज्ज आरोग्य व्यवस्थेचे कौतुक

यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सिंहस्थ इमारतीत भेट दिली व रुग्णांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतून सिंहस्थ इमारतीत हलविण्यात आलेल्या कॅज्युलिटी आणि आपत्कालीन वॉर्डचीही त्यांनी पाहणी केली.

त्यावेळी सुसज्ज आरोग्य व्यवस्थेचे त्यांनी कौतुक देखील केले.  यावेळी बैठकीसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांसह आरोग्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी आरोग्य सुविधेचा आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयातील भरती प्रक्रियेसंदर्भात जाणून घेतले. रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा पुरवण्याबाबत या बैठकीत त्यांनी सूचना केल्या. (Dada Bhuse)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here