Skip to content

Manoj Jarange | मनोज जरांगे फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना

Manoj Jarange

Manoj Jarange |  गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. दरम्यान, ते आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने ते रवाना झाले आहेत. ते आता अंतरवली सराटी या त्यांच्या आंदोलनस्थळावरून मुंबईकडे निघाले आहेत.

गेल्या १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे हे उपोषणाल बसले होते. त्यानंतर त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी फडणवीस यांनी सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता ते मुंबईला निघाले असून, मी एकटाच जाणार असून, मराठा बांधवांनी माझ्यासोबत येऊ नये, अशी विनंती मराठा समाजाला केली आहे. मात्र, त्यांची प्रकृती खालावलेली असल्यामुळे तसेच ते अशक्त असल्याने त्यांनी मुबंईला जाण्याचा आग्रह सोडावा, अशी विनंती त्यांना मराठा बांधव करत आहेत. (Manoj Jarange)

Manoj Jarange | तिकडे आरक्षण एकमताने पास अन् इकडे जरांगेंनी सलाईन फेकली

मात्र, तरीही ते गाडीमध्ये बसले असून, मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांचा जमाव हा त्यांच्यासोबत निघाला आहे. त्यांनी राज्य सरकारला सगे सोयऱ्यांची मागणी मान्य करण्यासाठी काल पर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर रात्रीपासून त्यांनी पाणीही न पिता कडक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यातच त्यांनी आज केलेले आरोप आणि अचानक मुंबईला जाण्याचा घेतलेला हा निर्णय पाहता यावर आता राज्य सरकार काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.(Manoj Jarange)

Manoj Jarange | मनोज जरांगेंचे फडणवीसांवर जीवे मारण्याचे आरोप

दरम्यान, आज मध्यमांसोबत बोलताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले असून यावेळी ते म्हणले की,”फडणवीस यांचा मला जीवे मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे आता मी सलाईन घेणेच बंद केले असून, नारायण राणे व अजय बारसकर यांच्या मागे देखील देवेंद्र फडणवीसच आहेत. त्यामुळे आता फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून होत नाहीये. कारण त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. (Manoj Jarange)

Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव; समाजाला भावनिक साद…

मी येथे छत्रपतींसमोर बसून सांगतो की, मी कुठल्याही पक्षाचा नाहीये. मी कोणाच्याही पक्षाचे काम करत नाही. मी फक्त माझ्या समाजाचा आहे. माझा समाज हाच माझा देव आहे आणि माझी माझ्या समाजावरच निष्ठा आहे. काही लोक मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न बघत आहे.” असे गंभीर आरोप जरांगे यांनी फडणवीसांवर केले असून, ते आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो तिथे माझा बळी घे. तिथे मला गोळ्या घाला. असे आव्हण देखील जरांगे यांनी फडणवीसांना दिले आहे. (Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!