Nashik Crime | नाशिकच्या सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिकावर गुन्हा दाखल

0
4
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime |  नाशिकमधील एका सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिकावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधित सराफ व्यावसायिकावर आणि त्यासोबत आणखी एका जणावर कोट्यवधी रुपये किंमतीच्या दागिन्यांचा अपहार करुन त्यातून चुकीच्या पद्धतीने मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका साठ वर्षीय संशयित व्यक्तीने अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार एक कोटी सतरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमधील एक नावाजलेल्या सराफ व्यवसायिकासह सहा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, यापैकी दोन व्यक्तींना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.(Nashik Crime)

Nashik Crime | नेमकं प्रकरण काय..?

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एका ६० वर्षीय सेवानिवृत्त परिवहन अधिकाऱ्यांनी याबाबत अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, या साठ वर्षीय तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोने, चांदीच्या दागिन्यांचा अपहार झाल्याच त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार एक कोटी सतरा लाख चौऱ्यांशी हजार रुपयांच्या अपहाराचा गुन्हा या सहा संशयितांविरुद्ध पोलिसांनी दाखल केला आहे.(Nashik Crime)

Nashik Crime | नाशिकमध्ये नामांकित हॉस्पिटलच्या ICU मध्ये डॉक्टरवर हल्ला

दरम्यान या प्रकरणी श्याम आडगावकर, महेश आडगावकर, सागर आडगावकर, शंकर पंडित गोडसे, मयूर शहाणे, राजेंद्र शहाणे हे सहा संशयित असून, यापैकी श्याम आडगावकर आणि शंकर गोडसे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवार (दि. २२) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास या दोघं संशयितांना पोलिसांनी अटक केली असून,  त्यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.(Nashik Crime)

Nashik Crime | नशिकमध्ये पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

नामांकित सराफ व्यावसायिकांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल 

या वरील सर्व सहा संशयितांनी मिळून प्लॅनिंग करुन फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्यांचे सोने आणि चांदीचे दागिने घेतले. त्यानंतर ठरलेल्या मुदतीत त्यांचे दागिने परत न करता त्यात काही अफरातफर केली. तसेच या दागिन्यांचा अपहार करून पैशांतून मालमत्ता घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याधीही नाशिकमधील एका नावाजलेल्या अशा दंडे या सराफ व्यवसायिकावरही उपनगर पोलिसांत अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता पुन्हा आडगावकर यांसारख्या नामांकित सराफ व्यावसायिकांच्या कुटुंबावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलिस करत असून, या प्रकरणी आता पोलिस पुढे काय तपास करतील आणि यातून कोणाकोणाचे नाव समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Nashik Crime)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here