Gunratna Sadavarte | लोकसभा निवडणुकांच्या तारखा ह्या महिन्यात कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे राज्याक्ष देशाच्या राजकारणातही वेगवान हालचाली होताना दिसत आहे. यात भाजपने नुकतीच त्यांच्या उमेदवारांची पहिली यादि जाहीर केली असून, विरोधी पक्षांच्या गोटातही जगावाटपाचे सूत्र ठरताना दिसत आहे. आधीच लोकसभेच्या जागावाटपावरून पक्ष पातळीवर आणि इच्छुक उमेदवारांमध्ये स्थानिक पातळीवर रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, या निंवडणुकांच्या रिंगणात आता वकील गुणरत्न सदवर्ते यांनीही उडी मारली असून, ते देखील निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यातील दोन बड्या नेत्यांची नावे घेत त्यांच्या विरूद्ध आपण निवडणूक लढवू आणि पाणीपत करून सोडू असे आव्हान दिले आहे. (Gunratna Sadavarte)
एकीकडे आधीच लोकसभा जागावाटपावरून सत्ताधारी व विरोधक या दोन्ही गोटात तणावचे वतावरण असून, अजुनही काही महत्तवाच्या जागांचा तिढा सुटलेला नाही. हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असून, या किंवा पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक झाल्या की, काही काळानंतर विधानसभा निंवडणुकादेखील एकामागोमाग जाहीर होऊ शकतात. आधीच चढाओढ सुरू असून, अनेकांना तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात असून, यातच प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील उडी घेतली असून, त्यांनीदेखील निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.(Gunratna Sadavarte)
Dhule Loksabha | धुळे लोकसभेतील इच्छुकांच्या गर्दीत अविष्कार भुसे ठरताय लोकप्रिय…
महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांच्या विरोधात ते निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर, हे नेते आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे. या दोघांच्या विरोधात ते निवडणूक लढवणार असून, आपण पाणीपत करून सोडणार असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
Gunratna Sadavarte | या नेत्यांच्या विरोधात लढणार..
दरम्यान, यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की,”चुकीच्या विचारांच्या सोबत जाणारे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या दोघांविरुद्ध निवडणूक लढवायची वेळ आली आहे. काही हिंदुत्ववादी पक्षाकडून नक्की ‘डंके की चोट पे’ निवडणूक लढवेल. आणि एवधच नाहीतर त्यांचं पाणीपत करून सोडेल, असे थेट आव्हान गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरेंना दिले आहे. (Gunratna Sadavarte)
Loksabha 2024 | अशी आहे महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची यादी..?
पुढे ते म्हणाले की,”नथुराम गोडसे साहेबांचे विचारपीठ हे निर्माण व्हायला हवे. त्यांच्या पावन अस्थी कलशाच्या दर्शनासाठी मी आलेलो होतो. अस्थी कलशाचे दर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. यानंतर शक्ती प्रदान झालेली आहे. अखंड भारताची चळवळ ही पुन्हा एकदा उभी राहिलीच पाहिजे. राजकारणाच्या नावावर याठिकाणी आरक्षणाची दुकानदारी चाललेली असून, ती थांबवलीच पाहिजे. नथुराम गोडसेंच्या विचारांना कम्युनिस्ट थांबवू शकत नसल्याचंही यावेळी सदावर्ते म्हणाले. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना दिलेलं हे चॅलेंज खरं ठरणार का? आणि आता यावर ठाकरे पिता पुत्र काय उत्तर देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Gunratna Sadavarte)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम