Skip to content

Loksabha 2024 | अशी आहे महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची यादी..?

Loksabha 2024

Loksabha 2024 | हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असून, आता या महिन्यात कधीही लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. काल भाजपनेही त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादि जाहीर केली असून, यात पक्षातील बडे नेते कुठून निवडणुका लढवतील हे जाहीर करण्यात आले आहे. यानंतर आता विरोधकही त्यांचे उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत असून, टीव्ही 9 च्या वृत्तानुसार राज्यात महाविकास आघाडीची यादि समोर आली आहे.(Loksabha 2024)

आता लोकसभा निवडणुकांचे बिगुल हे कधीही वाजू शकते, अशी परिस्थिती असतानाच दोन्ही गोटात वेगवान हालचाली सुरू आहेत. काल भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत १९५ उमेदवारांची घोषणा झाली आहे. यात ३४ केंद्रीय मंत्री व राज्यमंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली असून, काही बड्या नेत्यांच्या मूला मुलींनाही संधी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत ४२ जागांचे वाटप झाले होते. मात्र, ६ जागांचा तिढा कायम होता. दरम्यान, हा तिढा तिन्ही पक्षांचे वरिष्ठ मिळून सोडवणार असल्याचे सांगितले जात होते. तर, दुसरीकडे वाटप झालेल्या जागांचे उमेदवार देखील निश्चित झाले असून, टीव्ही ९ च्या वृत्तानुसार कोणते उमेदवार कोणत्या जागेवरून निवडणुक लढणार हे ठरले आहे… (Loksabha 2024)

Dhule Loksabha | जनतेच ठरल…!, मालेगावचे ‘भाईजी’ दिल्लीत पाठवणार.!

अशी आहे उमेदवारांची यादि..?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट – 

 1. कल्याण – उपनेत्या सुषमा अंधारे किंवा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे
 2. ठाणे – राजन विचारे
 3. मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
 4. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
 5. मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तीकर
 6. पालघर – भारती कामडी
 7. छ. संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
 8. नाशिक – विजय करंजकर
 9. रायगड – अनंत गिते
 10. रत्नागिरी , सिंधुदुर्ग – विनायक राऊत
 11. मावळ – संजोग वाघेरे
 12. बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
 13. वाशिम, यवतमाळ- संजय देशमुख
 14. परभणी – संजय जाधव
 15. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
 16. धाराशिव – ओमराजे निंबाळकर(Loksabha 2024)
 17. जळगाव – हर्षल माने
 18. हिंगोली – नागेश आष्टिकर

Loksabha Election | महाविकास आघाडीत कोणाच्या वाट्याला कोणता मतदारसंघ..?

Loksabha 2024 | काँग्रेस – 

 1. मुंबई (उत्तर मध्य) – उमेदवार अद्याप ठरलेला नाही
 2. पुणे – मोहन जोशी किंवा रविंद्र धंगेकर
 3. सोलापूर – प्रणिती शिंदे
 4. भंडारा – नाना पटोले
 5. चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर किंवा विजय वडेट्टीवार
 6. अमरावती – बळवंत वानखेडे किंवा राहुल गडपाले
 7. गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान, डॉ. नितीन कोडवते या तिघांपैकी एक
 8. नांदेड – आशा शिंदे
 9. लातूर – उमेदवार अद्याप ठरलेला नाही(Loksabha 2024)
 10. धुळे – तुषार शेवाळे किंवा श्यामकांत सनेर
 11. नंदुरबार – के.सी.पाडवी
 12. वर्धा – हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुख
 13. नागपूर – अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार किंवा प्रफुल गुडधेंपैकी या तिघांपैकी एक
 14. जालना – उमेदवार अद्याप ठरलेला नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार

 1. बारामती – सुप्रिया सुळे
 2. शिरूर – अमोल कोल्हे
 3. सातारा – श्रीनिवास पाटील किंवा त्यांचा मुलगा सारंग पाटील
 4. माढा – लक्ष्मण हाके, (हे सध्या ठाकरे गटाचे प्रवक्ते, मात्र राष्ट्रवादीकडून लढण्याची शक्यता)
 5. रावेर – एकनाथ खडसे
 6. दिंडोरी – चिंतामण गावित
 7. बीड – नरेंद्र काळे
 8. अहमदनगर – निलेश लंके(Loksabha 2024)
 9. भिवंडी – बाळ्या मामा

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!