Deola |  “प्रहार” चे “बिऱ्हाड” तहसील कार्यलयावर…

0
13

Deola | प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज  देवळा येथे मेंढपाळांच्या हक्कांसाठी तहसील कार्यलयासमोर ‘बिऱ्हाड आंदोलन’ काढण्यात आले. यावेळी मेंढपाळांच्या चराईसाठी जागा आरक्षित करण्यात यावी, मेंढपालांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भातही कायदा अंमलात आणला जावा. आदी मागण्या ह्या आंदोलना दरम्यान करण्यात आल्या. यावेळी मेंढयासोबत घेऊन आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. नंतर तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .

देवळा तालुक्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे . प्रशासनाने याची दखल घ्यावी ,यासाठी संतप्त मेंढपाळांनी आज गणेश बिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली देवळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. गत वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमी प्रमाणात झाला असून , दुष्काळ सदृश्य परीस्थिती निर्माण झाली आहे. रानांत गवत नसल्याने शेळ्या, मेंढ्याची उपासमार सुरु झाली आहे. पिण्याचे पाणीही मिळत मुबलक मिळत नसल्याने पशुधन कुपोषित किंवा गतप्राण होत असल्याचेदेखील मेंढपाळांनी यावेळी सांगितले . ही जनावरं सांभाळायची काशी? ,असा प्रश्न आता मेंढपाळांसमोर उभा ठाकला आहे . त्यातही वनविभागाच्या जंगलात मेंढपाळांना येऊ देलं जात नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात.

Ahmednagar Ashti Train | अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग…

वन परिक्षेत्रात कुठल्याही प्रकारची झाडी नाहीत, फक्त गवत आहे. असं असतानाही प्रवेश नाकारला जात असल्यामुळे संतप्त मेंढपाळांनी थेट तहसील कार्यालयावर ‘बिऱ्हाड मोर्चा’ काढून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान यावेळी त्यांनी जनावरांनासाठी वनक्षेत्र मोकळे करून द्यावे ,मुबलक पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी ,तसेच चारा छावण्यांची उभारणी करावी , धनगर समाजाला आरक्षण ह्या आणि अश्या विविध मागण्या उपस्थित केल्या. यावेळी प्रहार चे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश बिंबाळकर ,युवा जिल्हाध्यक्ष बापू देवरे , जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव ,जिल्हा चिटणीस समाधान बागुल , जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे ,शशिकांत पवार , पप्पु व्हलगडे , हरिसिंग ठोके , शाम गोसावी ,सोपान चव्हाण आदींसह मेंढपाळ बांधव उपस्थित होते. सुमारे चार तास सुरु असलेल्या या बिऱ्हाड आंदोलनानंतर गणेश निबाळकर यांच्या शिष्टमंडळ आणि तहसीलदार विजय सूर्यवंशी , वनपरिक्षेत्र अधिकारी कौतिक ठुमसे ,पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे , वनरक्षक विजय पगार , नामदेव ठाकरे आदींशी चर्चा झाल्यानंतर आणि तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले . (Deola)

kolhapur | ‘गोकुळ’ विरोधात शेतकरी आक्रमक; कार्यालय व चिलिंग सेंटरची मोडतोड 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here