सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | देवळा तालुक्याची प्रमुख आर्थिक वाहिनी असलेल्या दि देवळा मर्चंट को. ऑप. बँकेच्या सभासदांना सन २०२२-२४ या आर्थिक वर्षासाठीच्या १०% डिव्हीडंड (लाभांश) ला रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाली असुन, प्रत्येक सभासदांच्या सेव्हिंग /करंट खात्यावर दि. 02 डिसेंबर रोजी लाभांश वर्ग होणार असल्याची माहिती बँकेच्या चेअरमन कोमल भारत कोठावदे, व्हा. चेअरमन डॉ. प्रशांत निकम यांनी दिली.
Deola | देवळा अभिनव विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
डिव्हीडंड वाटपास रिझर्व्ह बँकेकने दिली परवानगी
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या नफ्यातुन बँकेने १०% लाभांशाची रकमेची तरतुद लेलेली असुन त्यास नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन त्याचा रितसर प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आला होता. त्यास नुकतीच रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन बँकेची थकबाकी व एन. पी. ए. वाढल्यामुळे बँकेस डिव्हीडंड वाटपास अडचण येत होती. मात्र बँकेने वसुलीचे कडक धोरण अवलंबविल्याने थकबाकी व एन. पी. ए. मोठ्या प्रमाणात कमी झालेला असुन त्यामुळे डिव्हीडंड वाटपास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे.
इमारतीच्या नुतणीकरणाचे कामाचीही लवकरच पुर्तता करणार
मागील वर्षी प्रत्येक सभासदांस खुर्ची वाटप व यावर्षी डिव्हीडंड वाटपामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचेही चेअरमन. कोमल कोठावदे यांनी सांगीतले. त्याचप्रमाणे बँकेच्या इमारतीच्या नुतणीकरणासही सहकार खात्याची मंजुरी मिळाली असुन, इमारतीच्या नुतणीकरणाचे कामही लवकरच सर्व बाबींची पुर्तता करून करण्यात येणार आहे. भविष्यात बँकेच्या दैनंदिन व्यवहारातही डिजीटल बँकेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून बँकेमार्फत QR कोडची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा मानस चेअरमन कोठावदे यांनी व्यक्त केला.
Deola | देवळ्यात वधु-वरांनी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला केली आर्थिक मदत
याप्रसंगी ही मंडळी होती उपस्थित
याप्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन डॉ. प्रशांत निकम, जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे, राजेंद्र सुर्यवंशी, अनिल धामणे, केदारनाथ मेतकर, भगवान बागड, प्रमोद शेवाळकर, योगेश राणे, हेमंत अहिरराव, मयुर मेतकर, अमोल सोनवणे, सुभाष चंदन, मनिषा शिनकर, श्रीमती नलिनी मेतकर, भारत कोठावदे, चैतन्य वडनेरे, प्रशांत मुसळे, बँकेचे मुख कार्यकारी अधिकारी एस. पी. भालेराव, व्यवस्थापक एन. के. बोरसे उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम