Deola | महात्मा फुले यांच्या १३४ व्या पुण्यतिथीनिमित्त माळवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

0
12
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 134 व्या पुण्यतिथी निमित्त फुले माळवाडी येथील महात्मा फुले क्रीडा मंडळाने गुरुवारी दि. २८ रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर मंडळाने सलग पाचव्या वर्षी रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात मंडळातील सदस्यांनी सत्यशोधक पद्धतीने खंडोबाची तळी भरुन करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नामपुर येथील बालरोग तज्ञ डॉ. सोपान अहिरे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.

Deola | दे. म. को. बँकेला रिझर्व्ह बँकेची लाभांश वाटपाची परवानगी – चेअरमन कोमल कोठावदे

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल आहेर, व्याख्याते रामदास भोंग, माजी सभापती बाळासाहेब माळी, हिरामण पवार, जिल्हा रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गोरे, डॉ. मोहन वारके, देवळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश कांबळे उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक, मानवतावादी विचारांना पर्याय नाही – प्रा. डॉ. रामदास भोंग

या प्रसंगी कु. क्रांती बच्छाव, कु. रोहित शेवाळे आदींसह पाचवी ते दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राध्यापक डॉ. रामदास भोंग यांनी “मानवाला अजून रक्त बनवता आले नाही. म्हणजे रक्ताला पर्याय नाही. तसेच महात्मा फुले यांच्या सत्यशोधक, मानवतावादी विचारांना पर्याय नाही असे सांगितले.” याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बागुल, उपाध्यक्ष बापू बच्छाव, सचिव जयराम सोनवणे, दिलीप आदमे, यशवंत जाधव, मनोज बच्छाव, यशवंत सोनवणे, संजय शेवाळे, हेमंत बागुल, किरण आहेर, सागर बागुल, रिंकू जाधव, तात्या भदाणे, दावल भदाणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Deola | देवळा अभिनव विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

मंडळाच्या सचिवांनी साठाव्या वेळेस रक्तदान करून आदर्श ठेवला

माळवाडी – फुलेमाळवाडी येथील रक्तदाते व फुले प्रेमी नागरीक यांनी रक्तदान केले. सावित्रीच्या लेकी चाळीस महिलांनी रक्तदान केले. मंडळाचे सचिव जयराम सोनवणे यांनी 60 व्या वेळेस रक्तदान करून तालुक्यातून आदर्श निर्माण केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here