Political News | जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला; उदय सामंतांच्या सुचक विधानानं वेधलं लक्ष

0
37
#image_title

Political News | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. आव्हाड यांनी शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली असून या भेटी मागचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.परंतु या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Political News | एकनाथ शिंदेंनीच उपमुख्यमंत्री पद घ्यावे भाजपचा आग्रह; काय आहे कारण..? वाचा सविस्तर

आव्हाडांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राजकारणात सत्तास्थापन व मुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीवरून राज्यभरात हालचालींना वेग आला असून अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. सध्या राज्याचा कारभार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहत असून नुकतीच शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शिंदे सेनेच्या नेत्याचे मोठे वक्तव्य

अर्थमंत्री असताना अजित पवार अनेकदा मागणी करून देखील त्यांनी आपल्याला निधी दिला नसल्याची तक्रार यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या बाजूलाच राहतात. त्यामुळे त्यांनी आपल्याला अनेकदा मदत केली होती. असे देखील त्यांनी म्हटले होते. दरम्यान या भेटीबाबत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी खुलासा केला असून आव्हाड ठाण्याचे आहेत. तेव्हा मित्र म्हणून त्यांना भेटायचे असेल.” असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.त्याचबरोबर, “आव्हाड आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागत आहे.” असे देखील ते यावेळी म्हणाले.

Political News | राणा दाम्पत्याची बच्चू कडूंनी औकातच काढली; म्हणाले, ‘हिंमत असेल तर माझ्याविरोधात…’

दरम्यान, गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आघाडी यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी देखील या दोन नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली होती. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचे भेट घेतली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here