सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | म. वि. प्र. समाज संचलित, देवळा येथील अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनीष बोरसे होते. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
Deola | देवळ्यात वधु-वरांनी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला केली आर्थिक मदत
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी उपस्थित
यावेळी शिक्षकांच्या वतीने उपशिक्षिका श्रीमती शैला भामरे यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार विद्यालयाचे क्रीडाशिक्षक राकेश बिरारी यांनी मानले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम