सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | परस्परांच्या सहजीवनात प्रवेश करणाऱ्या येथील वधूवरांनी सोमवार (दि .२५) रोजी आपला विवाहसोहळा वेळेत लावून तसेच अन्य खर्चाला फाटा देत अनाथ व निराधार मुलांसाठी काम करणाऱ्या शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला २१ हजार रु. भेट दिले. ज्यांच्या जीवनात अंधार आहे. त्यांच्या जीवनात उजेड पेरणाऱ्या संस्थेला दिलेल्या या अनोख्या भेटीचे व वधूवरांच्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे.
Deola | नॅशनल हेरिटेज प्रश्नमंजुषा स्पर्धेत एस. के. डी. विद्यालयाचे घवघवीत यश
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, देवळा महाविद्यालयातील प्रा. आर. एन. शिरसाठ यांची कन्या शलाका व अरुण पवार यांचे पुत्र स्वामी यांचा विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. वधू आणि वर दोघेही उच्चशिक्षित असून चांगल्या हुद्द्यावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या विवाह सोहळ्यात इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन २१ हजार रुपयांचा धनादेश अनाथ, निराधार मुलांसाठी व आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदत करणाऱ्या शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला देऊ केले.
Deola | पिंपळगाव (वा.) जनता विद्यालयात संविधान दिन साजरा…
नवदाम्पत्याने दाखवलेल्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक
या संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. डी. के. आहेर यांच्याकडे या २१ हजार रुपयांचा धनादेश या वधूवरांनी सुपूर्द केला. या नवदाम्पत्याने दाखवलेल्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष तथा शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश ठाकरे यांच्यासह वधूवरांचे मातापिता व आप्तेष्ट उपस्थित होते.
“आपल्या कौटुंबिक विवाहसोहळ्यात समाजातील निराधारांची जाणीव ठेवत त्यांच्यासाठी आपण काहीतरी कृतिशील भाव व्यक्त करणारी ही संवेदनशीलतेची पावती आहे आणि ट्रस्टच्या कामावरील समाजाचा विश्वास आहे. आपल्या आनंदात अनाथांना सामावून घेण्याची ही वृत्ती समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.”
– प्रा. डॉ. डी के आहेर, कार्याध्यक्ष – शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम