Deola | पिंपळगाव (वा.) जनता विद्यालयात संविधान दिन साजरा…

0
21
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | पिंपळगाव (वा.) येथील म.वि.प्र.च्या जनता विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या संगीता आहेर होत्या. व्यासपीठावर प्रभारी पर्यवेक्षक अशोक खैरनार चंद्रशेखर चव्हाण हेमंत पवार, पृथ्वीराज सूर्यवंशी, वैशाली निकम, सुनिता आहेर, मंगला आहेर उपस्थित होते.

Deola | कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात संविधान दिन साजरा

मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संविधान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कु. श्रावणी अहिरे, संविधान अहिरे, अर्पिता अहिरे, कल्याणी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व ललित थोरात याने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

भारतीय संविधान देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर जोडते 

प्राचार्य संगीता आहेर यांनी “संविधान म्हणजे एक आधुनिक मूल्य व्यवस्थाच आहे. भारतीय संविधानाने सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देण्याची हमी दिलेली आहे. संविधानातील ही मूल्य मूलभूत हक्कांच्या रूपाने आलेली आहे. मूल्यांची संपूर्ण घटनात्मक चौकट ही आधुनिकतेला अनुसरून तयार करण्यात आलेली आहे. लोकशाही, समाजवाद व धर्मनिरपेक्षता ही आधुनिक महामूल्ये आहेत. त्याअंतर्गत इतर आधुनिक मूल्य विचारात घेण्यात आलेली आहे. संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो. असंख्य भाषा, जाती, पंथ, धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. भारतीय संविधान दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला प्रदान करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्य, स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणारी आहे.

Deola | खर्डेत आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विजयाचा जल्लोष

कला शिक्षिका रोहिणी आहेर संविधान दिनाचे आकर्षक फलक रेखाटले

संविधानाची मूलतत्त्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागृत नागरिक बनविणे याकरता, संविधानाची माहिती संविधानातील मूलतत्त्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलतत्त्वांविषयी जाणीव जागृती होणे आवश्यक आहे.म्हणून संविधान दिन साजरा केला जातो.” असे सांगितले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र निकम यांनी केले. तर आभार सरोज जाधव यांनी मानले. कला शिक्षिका रोहिणी आहेर संविधान दिनाचे आकर्षक फलक रेखाटले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here