Mahayuti Political | विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून निकाल लागून 5 दिवस उलटून गेले असूनही नवे सरकार अद्यापही स्थापन झालेले नाही. महायुतीने यश मिळवले. 288 जागांपैकी 230 जागा मिळवत महायुतीने आपली सत्ता राखली. यामध्ये भाजप सर्वाधिक म्हणजे 132 जागा मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला.
Mahayuti Political | सत्ता स्थापनेपूर्वीच युतीत बिनसलं?; सेना-राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर
‘या’ दिवशी होणार शपथविधी
महायुतीने घवघवीत यश मिळवून देखील अद्यापही सरकार स्थापन झालेले नाही. या आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असणार याबाबत उत्सुकता लागून राहिली असून काल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मुख्यमंत्री पदाकरिता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात असले तरी देखील अद्याप याबाबत अधिकृत घोषणा न झाल्यामुळे संभ्रम कायम आहे. अशातच नव्या सरकारचा शपथविधी येत्या 2 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती आता समोर आली असून शिवसेना व राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी 1 मंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती आहे.
Mahayuti Political | “उपमुख्यमंत्री व्हा अन्यथा…”; भाजपकडून शिंदेंसमोर दोन पर्याय
मंत्रिमंडळात शिंदे गटाला लॉटरी?
नव्या सरकार बाबत दिल्लीत आज बैठक होत असून सरकारमध्ये अजित पवारांकडे अर्थ मंत्रालय असेल तर गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार असल्याची माहिती आहे. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असेल हे देखील निश्चित होणार असल्याचे समजले असून यात शिंदे यांच्या गटाला अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्यांना पाठबळाची आवश्यकता भासू शकते. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरून माघार घेतली असली तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरिता व नाराजी दूर करण्याकरिता मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेंना अधिक जागा मिळू शकतात अशी माहिती आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम