Infotech news | स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त सॅमसंगचा नवा कोरा अँड्रॉइड टॅब

0
27

Infotech news |  सॅमसंग कंपनीने भारतीय बाजारात Galaxy Tab A9 ही नवीन सीरीज लाँच केली आहे. ह्या सीरिजमध्ये Galaxy Tab A9 व Galaxy Tab A9+ हे दोन मॉडेल सादर केलेले आहेत. हे ग्राहकांसाठी उपलब्धही झाले आहेत. कंपनीनं ग्रॅफाइट, सिल्व्हर तसेच नेव्ही असे दोन कलर मॉडेल यात सादर केले आहेत. चला जाणून घेऊया यांची किंमत व स्पेसिफिकेशन्स.

Samsung Galaxy Tab A9 

Samsung Galaxy Tab A9 हा ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज, वाय-फाय व्हेरिएंटसह उपलब्ध आहे. याची किंमत ही फक्त १२,९९९ रुपये इतकी आहे. तर वाय-फाय + ५जी व्हेरिएंटची किंमत ही १५,९९९ रुपये अशी आहे. Galaxy Tab A9+ च्या ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज वाय-फाय व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये इतकी आहे. तसेच, ५जी व्हेरिएंटची किंमत ही २२,९९९ रुपये इतकी आहे. तसेच ८ जीबी रॅम व वाय-फाय व्हेरिएंटची किंमत ही २०,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी एलटीई व्हेरिएंटची किंमत ही २४,९९९ रुपये इतकी आहे.

Infotech news | डिसेंबरमध्ये लॉन्च होत आहेत ‘हे’ जबरदस्त फोन

Samsung Galaxy Tab A9+

यात ११ इंचाचा WQXGA LCD डिस्प्ले दिलेला आहे. ज्याचे पिक्सेल रेजोल्यूशन हे १२०० x १९२० इतके आहे. हा ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटलाही सपोर्ट करतो. हा टॅब ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६९५ ह्या प्रोसेसरसह आलेला आहे. यात ८ जीबी पर्यंत रॅम तसेच १२८ जीबी इतकी स्टोरेजही देण्यात आले आहे. हा टॅबलेट अँड्रॉइड १३ यावर आधारित वनयुआय ५.१.१ वर चालतो.

या टॅबमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा मिळत आहे. तर, सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आलेला आहे. यात क्वॉड-स्पिकर सेटअपही आहे. जो सराउंड साउंडलाही सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी ५ जी, वाय-फाय, ब्लूटूथ तसेच यूएसबी टाइप-सी ह्या पोर्टचाही समावेश यात केलेला आहे. यात एक ई-सिम व एक फिजिकल सिम असा ड्युअल सिम सपोर्टही दिलेला आहे.

चांदवड | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्याच्या बांधावर

Samsung Galaxy Tab A9

ह्या सीरिजमधील छोट्या सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए९ ह्या टॅब्लेटमध्ये ८.७ इंचाचा WQXGA LCD डिस्प्ले दिलेला आहे. जो ८००x१३४० पिक्सेल रिजोल्यूशन व ६० हर्ट्झ रिफ्रेश रेटलाही सपोर्ट करतो. हा टॅबलेट मीडियाटेक हेलियो जी९९ ह्या प्रोसेसरसह आलेला आहे. जोडीला ४ जीबी रॅम तसेच ६४ जीबी स्टोरेजही मिळत आहे. हा टॅब अँड्रॉइड १३ यावर आधारित वनयुआय५.१.१ वर चालतो.

यात ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळणार आहे. तर, व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिलेला आहे. ह्यात ड्युअल-स्पिकरचा सेटअपही आहे जो, डॉल्बी अ‍ॅटमॉस ह्या सपोर्टसह येतो. पावर बॅकअपसाठी यात ५१०० एमएएचची बॅटरीही दिलेली आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ व यूएसबी, टाइप-सी पोर्टचाही यात समावेश आहे. यात एक ई-सिम व एक फिजिकल सिम असा ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आलेला आहे.

Nashik | नाशिकमध्ये यावर्षी ‘रेकॉर्ड ब्रेक’ खुनाच्या घटना


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here