Infotech news | डिसेंबरमध्ये लॉन्च होत आहेत ‘हे’ जबरदस्त फोन

0
23

Infotech news |  स्मार्टफोनप्रेमींसाठी डिसेंबर महिना खूप खास असणार आहे. कारण, ह्या महिन्यात अनेक उत्कृष्ट स्मार्टफोन्स हे बाजारात दाखल होत आहेत. ह्या यादीत वनप्लस, रिलमी व आक्यूओओ ह्या कंपनीच्या स्मार्टफोनचा विशेषकरून समावेश आहे.

ह्या प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये उत्कृष्ट कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसर तसेच उत्कृष्ट डिस्प्लेदेखील मिळणार आहे. ग्राहक ह्या स्मार्टफोन्सची खूप दिवसांपासून वाट बघत आहेत. या स्मार्टफोन्सच्या लॉन्चिंगची तारीख जशी जवळ येत आहे, तसतशी चाहत्यांमध्ये याबद्दल उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये लॉन्च होणाऱ्या ह्या स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊयात.

वनप्लस १२

जागतिक वापरकर्ते हे वनप्लस कंपनीच्या ह्या आगामी स्मार्टफोनची वाट बघत आहे. कंपनी त्यांचा हा नवा स्मार्टफोन वनप्लस १२ हा चीन येथे लॉन्च करणार आहेत. ह्या स्मार्टफोनबाबत वनप्लस इंडिया यांच्या वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आले होते.  माहितीनुसार, ह्या २३ जानेवारी २०२४ रोजी हा स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. ह्या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

चांदवड | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्याच्या बांधावर

रीयल मी जीटी 5 प्रो

रियलमी जीटी ५ प्रो ह्या स्मार्टफोनची ग्राहक आतुरतेने वाट बघत आहेत. येत्या ७ डिसेंबर २०२३ रोजी हा स्मार्टफोन चीन येथे लॉन्च होणार आहे. दरम्यान, लॉन्चनंतर काही आठवड्यांतच तो भारतात दाखल होऊ शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 हे प्रोसेसर मिळणार आहे.

यात कंपनी ५ हजार ४०० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. तसेच, जी १०० व्हॅट हे फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सोबतच ह्या फोनमध्ये २४ जीबी रॅम व १ टीबी स्टोरेज मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरादेखील देण्यात आला आहे. ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळनारा आहे. ह्या फोनमध्ये ६.७८ इंच डिस्प्ले मिळणार आहे. जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्टही करेल.

आक्यूओओ १२

आक्यूओओ ह्या कंपनीचा स्मार्टफोन हा भारतात येत्या १२ डिसेंबर रोजी लॉन्च होत आहे. कंपनी ह्या स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली Snapdragon 8 Gen 3 हे प्रोसेसर देणार आहे. तसेच फोटोग्राफीसाठी ह्या फोनच्या बँक पॅनलवर चार कॅमेरेही दिसणार आहेत.

या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह ५० मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स तसेच ६४ मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्सचाही समावेश आहे. कंपनीने हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. तर, भारतात ह्या फोनची किंमत ही ६० हजार रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

Nashik | नाशिकमध्ये यावर्षी ‘रेकॉर्ड ब्रेक’ खुनाच्या घटना


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here