विकी गवळी-प्रतिनिधी : चांदवड | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या बहादुरी गावातील उध्वस्त झालेल्या द्राक्षबागांची केली पाहणी आहे. यावेळी चांदवड येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. पंचनाम्यांचे निकष लावले तरीही यंदा शंभर टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना राज्य शासनाला तातडीने दिलासा द्यावाच लागेल, असे त्यांनी सांगितले आहे. या निमित्ताने काँग्रेसला राज्य सरकारविरोधात मोठा मुद्दा मिळालेला आहे.
Nashik | नाशिकमध्ये यावर्षी ‘रेकॉर्ड ब्रेक’ खुनाच्या घटना
चांदवड या आवर्षणग्रस्त तालुक्यात यंदा पावसाळ्यात पाऊस नसल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. या भागातील प्रमुख कॅश क्रॉप असलेल्या द्राक्षांचे गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केलेले आहे. यामध्ये अनेक गावांत मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, पालकमंत्री, आमदार आदींनी याबाबत भेटी देऊन शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विविध घोषणा केल्या आहेत आणि सध्या त्यावर मोठे राजकारण सुरू झालेले आहे.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विविध शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी यंदा बँकेकडून पीककर्ज घेऊन द्राक्षबागांवर जेवढा खर्च केला, तो सर्व वाया गेला आहे. यापुर्वीचा अनुभव लक्षात घेता, राज्य सरकार काहीही मदत करत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Crime News | मद्यधुंद प्रेमीयुगलाने भररस्त्यात घातला राडा
यासंदर्भात थोरात यांनी सद्यस्थितीत शंभर टक्के नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. त्यामुळे कृषी विभागाने पंचनामे करताना, त्यांची नोंद घ्यावी. अहवाल तयार करताना ही वस्तुस्थिती त्यात नोंदवावी आणि तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आम्ही राज्यातील सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन विधीमंडळात त्यावर सरकारचे लक्ष वेधू तसेच राज्य शासनाला अवकाळीची नुकसान भरपाई द्यावीच लागेल. यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, राजाराम पानगव्हाणे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव, रमेश कहांडळ, भिमराव जेजुरे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी कासव, उत्तमराव ठोंबरे, अरूण पगार आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम