Skip to content

Milk protest | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अभिनेते मकरंद अनासपुरे मैदानात


Milk protest |  दुधाचे दर हे दूध संघांनी पडल्याचे आरोप करत हे दर वाढवण्याच्या मागणीसाठी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी अकोले येथील तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.

गायीच्या दुधाला ३४ रुपये प्रति लिटर दर देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, त्यांच्या ह्या आंदोलनाला सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपूरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. मकरंद अनासपूरे यांनी येथील आंदोलन स्थळी भेट देत शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे.

अभिनेते मकरंद अनासपूरे यांनी दूधाच्या दरवाढीच्या मागणीसाठी किसान सभेच्या अकोला येथील आंदोलकांची भेट घेतली. यावेळी अनासपूरे माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, दुध दर वाढवण्याची शेतकऱ्यांची ही मागणी रास्त आहे. ग्राहक म्हणून आपण जास्त दराने दूध घेत असतो.

Infotech news | स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त सॅमसंगचा नवा कोरा अँड्रॉइड टॅब

यातील १० रुपये जर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले तर, कुणाचं काय बिघडलं. शेतकरी काही परग्रहावरून आलेले नाही ते आपलेच बांधव आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार होणे गरजेचे आहे. मागील आठ वर्ष शेतकरी बांधवांच्या बाजूने काम करताना, बऱ्याच गोष्टी मलाही आढळून आल्यात. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना माझा तहहयात पाठिंबा असेल, असेही यावेळी मकरंद अनासपुरे म्हणाले आहेत.

राज्यात दुधाचे दर हे दूध संघांनी पाडल्याचा आरोप हा डॉ. नवले यांनी केला आहे. गाईच्या दूधाला ३४ रुपये प्रतिलीटर दर दिला जावा असे आदेश राज्य सरकारचे असताना हा आदेश दूध संघांनी कसा फेटाळून लावला. दरम्यान, ह्या मागणीबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी प्रतिनिधी आणि दूध संघांचे प्रतिनिधी यांसह घेतलेली बैठकही निष्फळ ठरली.

यामुळे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी हे अकोल्यात आंदोलनाचे हत्यार उपसलेले असून, अकोल्याच्या तहसीलदार कचेरीसमोर त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत आंदोलन सुरू केले आहे.

Infotech news | डिसेंबरमध्ये लॉन्च होत आहेत ‘हे’ जबरदस्त फोन


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!