Skip to content

Reels | पतीने रील्स बनवण्यास विरोध केला अन् पत्नीने पतीला संपवले

Reels

Reels |  ऐकावं ते नवलंच..!. सध्या अनेक छोटछोट्या कारणांवरून थेट खूनाच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता एका क्षुल्लक कारणावरून पत्नीने पतीला संपवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पतीने पत्नीला रील्स बनवण्यास नकार दिल्यामुळे पत्नीने पतीला संपवले आहे. (Reels)

ही घटना बिहारच्या बेगुसराय मधील असून, पतीने आपल्या पत्नीला “रिल्स बनवत जाऊ नको, ते तू थांबव” असे सांगितले होते. म्हणून पत्नीसह सासरच्या लोकांनी त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना खोडबंदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत मयत पतीचे नाव हे महेश्वर कुमार राय असे असून, आरोपी पत्नीचे नाव राणी कुमारी आहे. ७ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झालेले होते. (Reels)

Crime News | माझ्याशी लग्न कर नाहीतर…; तरुणीसोबत केले धक्कादायक कृत्य

मात्र, जेव्हापासून पत्नी रील्स बनवायला लागली. तेव्हापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तेढ निर्माण होण्यास सुरुवात झाली. मृत पती हा कोलकाता येथे मजूरी करत असत, आणि त्याची पत्नी तिच्या माहेरी राहत होती. तो नुकताच घरी परतला असता, त्याची पत्नी सोशल मीडियावर रील्स बनवत असल्याचे त्याला समजले. दरम्यान, तो तिला सोशल मिडियावर रील बनवण्यास विरोध करत असल्याने  त्यांच्यात वाद झाले आणि हा वाद पुढे खूप वाढला. याच कारणावरून पत्नी आणि सासरच्या लोकांनी त्याला गळा दाबून संपवले. (Reels)

Reels | भावाला संशय आल्याने प्रकरण उघडकीस 

मृत महेश्वर हा रविवार रोजी त्याच्या पत्नीच्या माहेरी गेला होता. दरम्यान, काही वेळानंतर त्याच्या भावाने त्याला समाप्रक करण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा फोन दुसर कोणी तरी उचलल्यामुळे भावाला संशय आला. आणि त्याने वडिलांना तेथे जाण्यास सांगितले. दरम्यान, वडील तेथे गेल्यावर त्यांना हे सर्व प्रकरण उमगले आणि त्यांनी तातडीने पोलिस ठाणे जवळ केले आणि सुनेच्या व सुनेच्या घरच्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.(Reels)

Rape Case | फूस लावत घरी बोलावले अन्..; मित्रांसह प्रेयसीवर अत्याचार

पत्नीच ठरली वैरिन

महेश्वरच्या मृत्यूची बाब उघडकीस आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या पत्नीसह तिच्या घरच्यांच्या विरुद्ध तक्रार केली असून, यात त्यांनी महेश्वर हा कोलकाता येथे मजुरी काम करतो. तो दोन दिवसांसाठी घरी आला होता. त्याला त्याची पत्नी रील्स बनवत असल्याचे कळाले. ते त्याला आवडत नव्हते. त्याने विरोध केला असता पत्नी आणि तिच्या घरच्यांनी त्याला गळफास लावत संपवले. असे नमूद केले आहे. (Reels)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!