Chhagan Bhujbal | मोदींचा नाशिक दौरा; भुजबळ मात्र नियोजनातही नाही!

0
1
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal | १२ जानेवारी रोजी म्हणजेच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार असून शहरात होणाऱ्या ‘२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवा’ च्या निमित्ताने उद्या पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे. नाशिक पोलिसांनी कालच मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मनाई आदेश लागू केलेत.

Rape Case | फूस लावत घरी बोलावले अन्..; मित्रांसह प्रेयसीवर अत्याचार

दरम्यान, शहरातील अनेक प्रमुख वाहतूक मार्गातही काही बदल करण्यात आले असून सभास्थळी येणाऱ्यांसाठी अनेक ठिकाणी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. उद्या शहरात वाहतुकीसाठी काही प्रमुख रास्ते हे बंद करण्यात आलेले असून, या मार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे. नाशिक नगरी ही सध्या सजत असून याची मोदींच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या सगळ्या नियोजनात नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ कूठेही नसल्याने सध्या राजकीय वर्तूळात कूजबूज सुरु झाली आहे.

Chhagan Bhujbal | अजित पवार गटाने तयारीकडे पाठ फिरवल्याचे चित्र

‘२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवा’ च्या आयोजनासाठी नाशिकमध्ये अनेक राजकीय नेते दाखल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या पार्श्वभूमीवर दोन-तीन दौरे केले आहेत. मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नाशकात तायारीचा आढावा घेत आहेत. नाशकात भाजप आणि शिवसेना तयारीत आघाडीवर असली मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाने मात्र तयारीकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Ajit Pawar | शालिनीताईंचा मानसिक तोल ढासळला; उदयकुमार आहेरांचे प्रत्युत्तर

नाशिकचे मंत्री छगन भुजबळ हे या कार्यक्रमापासून अलिप्त असल्याचे दिसून येत असून छगन भुजबळ हे गुरुवारी नाशकात असूनही तो नियोजन बैठकीला उपस्थित नव्हते.  नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तर, या बैठकीला विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ वगळता अजित पवार गटाचे मंत्री, आमदार व अन्य पदाधिकारी उपस्थित नव्हते. या बैठकीचे निमंत्रण आम्हाला दिले गेले नव्हते, असे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. आता या सर्व प्रकारामुळे राजकीय चर्चांना उधान येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here